‘सेक्सटॉर्शन’ म्हणजे काय…?

0
471
बातम्या शेअर करा

कोकणातील चिपळुणसारख्या छोट्याशा शहरातील पोलीस ठाण्यात सायबर गुन्ह्यांसंबंधी काम करीत असताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे सेक्सटॉर्शनचे वाढलेले प्रमाण. म्हणुनच आज या विषयावर विस्तृतपणे लिहितोय.

सेक्सटॉर्शन म्हणजे काय? तर अगदी साध्या सोप्या भाषेत सांगायचे तर सोशल मिडियावरील किशोरवयीन, तरुण किंवा धनाढ्य व्यक्तिंना फेसबुकसारख्या माध्यमातुन हेरुन मुलींच्या प्रोफाईलवरुन रिक्वेस्ट पाठवुन त्यांच्यासोबत मैत्री केली जाते. त्यांचा विश्वास संपादन केल्यानंतर हळुहळु त्यांचेसोबत अश्लील बोलले जाते व कालांतराने त्यांचेसोबत विडिओ कॉल केला जातो. ओळखीतुन तरुणी नग्न होवुन विडिओ कॉल करते व समोरील व्यक्तिलाही कपडे काढायला लावले जातात. त्यानंतर पुरुषाला ब्लॅकमेल केले जाते व सदरच्या विडिओ या त्यांच्या जवळील व्यक्तींना पाठवण्याची,मित्र, कुटुंबातील सदस्य किंवा सहकाऱ्यांसोबत शेअर करण्याची धमकी देतात. तसेच सोशल मिडियावर पोस्ट करण्याची धमकी देवुन खंडणी मागण्यास सुरुवात होते. सदरची रक्कम ही बनावट खात्यामध्ये मागवली जाते. हा एक ब्लॅकमेल करण्याचा प्रकार आहे. जर तुम्ही पैसे दिले नाहीत तर गुन्हेगारांची दुसरी योजना सुरु होते ती म्हणजे व्हॉट्अपवर पोलीस अधिका-याचा फोटो असलेला किंवा ट्रु कॉलरवर पोलीस नावाने कॉल येतो व गुन्हा दाखल झल्याची धमकी देवुन अटकेची कारवाईची भिती दाखवुन पैसे उकळले जातात. बहुदा असा कॉल व्हॉइस मॉड्युलेशन सॉफ्टवेअर वापरुन पोलिस अधिकाऱ्याची तोतयागिरी करुन केला जातो. काही वेळा सेक्सटॉर्शन करण्यात येणा-या पुरुषांना सांगण्यात येते की व्हिडिओमधील मुलीने आत्महत्या केली होती; आणि केस बंद करण्यासाठी पैसे द्यावे लागतील.

फक्त मुलंच नाही तर मुलीही सेक्सटॉर्शन मध्ये फसविल्या जातात. यांना वेगळ्या प्रकारे फसविले जाते. उदा. एखाद्या मुलीला देखण्या पुरुषाची रिक्वेस्ट येते मग सोशल मिडीयाच्या माध्यमातुन मोबाईल नंबरची देवाणघेवाण होते. काही मुली आपले खाजगी फोटो समोरच्या पुरुषासोबत शेयर करतात आणि तेथुुन ते फोटो सार्वजनिक करण्याची धमकी दिली जाते व खंडणी घेतली जाते. दुसरी पद्धत म्हणजे भारतीयांना विदेशी व्यक्तिंचे वेड आहे. मुलीसोबत/ मुलासोबत ओळख केली जाते व एअपोर्टवर तुमच्यासाठी काही वस्तु पाठविल्या आहेत असे सांगुन पैसे उकळले जातात.

पैसे दिल्याने सेक्सटॉर्शन बंद होते का? या प्रश्नाचे उत्तर नाही असे आहे. तुम्ही जेवढे पैसे पुरवता तेवढ्या जास्त वेळा पैसे मागीतले जातात. माझ्या एका मैत्रीणीच्या भावाने दोन वर्षात तब्बल साडेपाच लाख रुपये अशा अज्ञात माणसांच्या खात्यावर पाठवले आहेत म्हणजे सेक्सटॉर्शनचा कालावधी केवढा असु शकतो पहा.

सेक्सटॉर्शनसाठी विवाहीत पुरुष व किशोरवयीन मुले टारगेट केली जातात. कारण अशा पुरुषांना त्यांना त्यांचे कुटुंब आणि समाजासमोर जाण्याची भिती वाटते. माझ्या फेसबुक अकाऊंटवर जवळपास शंभरहुन अधिक रिक्वेस्ट अशा प्रकारच्या फेक आहेत.

पालक किंवा कुटुंबप्रमुख म्हणुन आपली जबाबदारी काय?
बरेचदा सेक्सटॉर्शनमध्ये सापडलेले पुरुष हे आर्थिकदृष्टया संपुन जातात व मानसिकदृष्ट्या खचुन जातात. दुर्दैवाने बरेचदा अल्पवयीन किशोरवयीन मुले आत्महत्येचा मार्ग स्विकारतात. म्हणुन किशोरवयीन मुलांना म्हणजे ज्यांच्या हातात आपण मोबाईल खाजगी स्वरुपात वापरायला देतो त्यांचेसोबत या विषयावर सविस्तर चर्चा केली पाहीजे. भारतात लैंगिक शिक्षण दिले जात नाही परंतु आपण पालक म्हणुन मुलांसोबत मैत्रीभाव वाढवुन या विषयावर बोलायला हवं कारण लैंगिक उत्तेजना हि नैसर्गिक आहे. किमान कौंटूंबिक चर्चेेत असे विषय यायला हवेत जेणेकरुन अशा प्रकारच्या घटना समाजात घडतात म्हणुनतरी मुलं सावध होतील. प्रौढ व्यक्तिसोबत अशी घटना घडल्यास त्याला मानसिक धीर द्यायला हवा. बरेचदा सेक्सटॉर्शनमध्ये समोरुन नग्न स्त्री चा विडिओ कॉल येतो व आपला नग्न विडिओ एडिट केला जातो.

असं काही आपल्यासोबत घडल्यास काय करावे?
डरने का नै……एकही रुपया कुणाला देवु नका.. सरळ आपल्या जवळचे पोलीस ठाणे गाठा जे आपल्याला मदत करण्यासाठी २४ तास सताड उघडं असते. तुमच्या माहितीसाठी सांगतो बरेचदा खऱ्या महिलेचा फक्त फोटो समोरील पिडीत व्यक्तिला दाखवलेला असतो. व्हिडिओ कॉलमध्ये टार्गेटचा फ्रंट कॅमेरा, तर महिलेचा रिअर कॅमेरा चालू असतो. महिला स्वतः नग्न होत नसते, तर रिअर कॅमेरा चालू आहे हे दाखवून पॉर्न व्हिडिओ चालवले जातात.

घडलेल्या घटनेबाबत आपल्या घरच्यांना प्रथम सांगा. गुन्हेगारांसोबत संवाद बंद करा. आपल्या घरच्यांना विश्वासात घ्या बाकी समाजातील लोकं काय म्हणतील याचा विचार अजिबात करु नको. ते किमान शंभर विविध फोनवरुन फोन करतील शक्य असेल तर महिनाभर ते सीमकार्ड वापरु नका.एखाद्या नातेवाईकाला सदरचा मेसेज अथवा फोटो प्राप्त झाल्यास नातेवाईकांना छान म्हणत रिप्लाय द्या.

मी चिपळुणात आल्यापासुन माझ्याकडे दोन वर्षात बरेच प्रौढ व किशोरवयीन मुले ‘ सेक्सटॉर्शन’ संबंधी भेटायला आली. माझ्या कुटुंबातील सदस्य म्हणुन आपलेणाने त्यांना व त्यांच्या नातेवाईकांना विश्वासात घेवुन सर्व गोष्टी समजावुन सांगीतल्यामुळे त्यांचे आर्थिक व जीवीताचे नुकसान झाले नाही.

महत्वाचे – अनोळखी महिला, पुरुष यांच्या रिक्वेस्ट स्विकारु नका. स्विकारायची असेल तर त्याची वॉल पहा व तो किती दिवसापासुन लिहितोय किंवा अकाऊंट आहे ते पहा. लॉक प्रोफाईलच्या नादी लागु नका. फेसबुक इन्स्टाच्या जाहिरातींना, अमिषाला बळी पडू नका.

जर तम्ही हा लेख वाचला असाल तर नक्की एकातरी मित्राला पाठवा जेणेकरुन कोणीतरी एकाचे आर्थिक नुकसान वा आत्महत्येपासुन परावृत्त करता येईल.

अशाच प्रकारच्या सेक्सटॉर्शन किंवा आर्थिक फसवणुकीसंबंधी घटना आपल्यासोबत घडल्यास 1930 या क्रमांकावर फोन करा किंवा https://www.cybercrime.gov.in/ यावर तक्रार रजिस्टर करा आणि माझ्यासोबत बोलायचं असेल तर हक्काने इनबॉक्सचा वापर करा किंवा किंवा 9960325174 वर कॉल/व्हॉट्अप करा.

आशिष बल्लाळ..


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here