‘वाशिष्ठी डेअरी’च्या स्वादिष्ट मोदकांसह गणेशोत्सवचा आनंद करा द्विगुणित…

0
67
बातम्या शेअर करा

चिपळूण – अल्पावधीतच ग्राहकांच्या विश्वासाला पात्र ठरलेल्या चिपळूणमधील ‘वाशिष्ठी डेअरी’च्या अनेक दुग्धजन्य पदार्थांनी खवय्यांच्या मनात घर केले आहे. आता गणेशोत्सवच्या पार्श्वभूमीवर या डेअरीतून तयार झालेले चविष्ट खवा मोदक मार्केटमध्ये दाखल झाले आहेत. या मोदकांना वाढती मागणी आहे. 21 मोदकांच्या पॅकेटची किंमत अवघी 150 रुपये आहे.

‘वाशिष्ठी डेअरी’ने पदार्थांच्या क्वालिटीशी कोणतीही तडजोड ठेवलेली नाही. त्यामुळेच कमी कालावधीत या डेअरीच्या माध्यमातून मिळणारे दुग्धजन्य पदार्थ लोकप्रिय झाले आहेत. दूध, ताक, श्रीखंड, आम्रखंड, लस्सी, पनीर, आईस्क्रीम या प्रत्येक पदार्थांची चवच न्यारी आहे. आता तर गणेशोत्सव निमित्त खास खवा मोदक तयार करण्यात आले आहेत. बाप्पाप्रेमी खवय्यांसाठी तर ही विशेष पर्वणी ठरणार आहे. वाशिष्ठी डेअरीच्या ‘आउटलेट’सह मार्केट मधील अनेक दुकानांमध्ये हे मोदक विक्रीसाठी उपलब्ध आहेत.

आम्ही ग्राहकांचा विश्वास जपण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे इतर पदार्थांप्रमाणेच खवा मोदक सुद्धा खवय्यांच्या पसंतीस उतरतील यात शंका नाही, अशी प्रतिक्रिया डेअरीचे संचालक प्रशांत यादव आणि मुख्य प्रवर्तक सौ. स्वप्नाताई प्रशांत यादव यांनी देऊन सर्व गणेशभक्तांना आगामी गणेशोत्सवच्या शुभेच्छा दिल्या आहेत.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here