गुहागर – गुहागर तालुक्यातील सामाजिक क्षेत्रात नेहमीच अग्रेसर असणारे पालपेणे येथील युवा कार्यकर्ते उमेश रमेश खैर यांना कोकणस्थ कुंभार समाज विकास संस्था पुणेच्या वतीने “समाजभुषण पुरस्काराने” नुकतेच सन्मानित सन्मानित करण्यात आले. कोकणस्थ कुंभार समाज विकास संस्था पुणे यांनी १५ ऑगस्ट रोजी समाजाचा महासोहळा ऑफलाईन व ऑनलाईन फेसबुकच्या माध्यमातून दिमाखात आयोजन केले. संस्थेचे अध्यक्ष कोकणरत्न चंद्रकांत चिवेलकर यांच्या प्रेरणेने समस्त समाज बांधव मोठया संख्येने एकत्रित झाले होते.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान कृष्णा अंबिरकर तर कार्यक्रमाची प्रमुख उपस्थिती महापौर मुरलीधर मोहोळ व आदी मान्यवरांनी भूषविले. इयत्ता १० वी मधे ७५ टक्के गुण मिळविलेल्या श्रवण पंदिरकर व इयत्ता १२ वी मधे ९२ टक्के गुण मिळविलेल्या आदित्य कुंभार व सान्वी पवार यांचे विषेश गुणवंत विद्यार्थी पुरस्कार प्रदान करून त्यांचे कौतुक केले गेले. त्याचबरोबर समाजासाठी मनापासून झटणाऱ्या व आपल्यातील कलागुणांची जनमाणसात विशेष छाप सोडणाऱ्या मान्यवरांना विविध पुरस्काराने सन्मानित केले गेले. यामध्ये उमेश रमेश खैर (गुहागर), अनिल तुकाराम नरवणकर (पिंपरी- चिंचवडकर), सुभाष सुकलेश्वर जाधव (नाशिक) यांना “समाजभूषण” पुरस्काराने तर “समाजगौरव” पुरस्कारा साठी श्री कृष्णा अंबिरकर (चिखली) याचबरोबर अनेक मान्यवरांचे विशेष गुणवंत विद्यार्थी पुरस्कार, गुणवंत विद्यार्थी पुरस्कार, विशेष गुणवंत गृहिणी पुरस्कार यांचे सन्मानपत्र व स्मृतीचिन्ह देवून गौरवविण्यात आले.
कार्यक्रमाची सुरूवात ऑनलाइन स्वरूपात अमोल निवळकर व सोहम गुहागरकर यांच्या निवेदनाने तर कार्यक्रमानमध्ये गावच्या मंगळागौर पासून देशभक्तीपर गीत, नृत्य, भक्तीगीत, समुहगीत, तबला वादन, चित्रपटगीत अशा विविधांगी मेजवानीने रंगतदार झाला या सोहोळ्याचा आस्वाद अखिल कुंभार बांधवांना घेता यावा यासाठी फेसबुक च्या माध्यमातून ‘ LIVE’ सदारीकरण पाहण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. यासाठी समाजाचे खजिनदार राजेंद्र पडवेकर, उपाध्यक्ष समाजरत्न गजानन बागवडे, अशोक शिरकर व सूर्यकांत चिवेलकर , तुकाराम शिरकर, संतोष कळमकर, धनंजय बागावडे, छाया साळवी, संदीप मटकर सागर विन्हेरकर, साईचंद्र करंजेकर, मदन व्हालकर, अजय वाडकर यांनी विशेष मेहनत घेतली.