परिपाठ झाल्यावर नेहमीप्रमाणे शाळा भरली.सर्व मुले आनंदात, उत्साहात आपापल्या वर्गात आली.पण मी वर्गशिक्षिका असणाऱ्या वर्गातील प्रणिता लोहार मात्र गैरहजर होती.बरेच दिवस शाळेत येत नव्हती. हीच प्रणिता म्हणजे आमची ‘पारू’.
प्रणिता शाळेत काही येईना.आमचा वर्ग तर चांगला होता.वर्गातील सर्व मुले मिळून मिसळून वागणारी होती.वर्ग हवेशीर होता.पण प्रनिताने वर्ग च अजून बघितला नव्हता.इयत्ता १ ली ते ५ वी चां टप्पा ओलांडून तिने ६ वी त प्रवेश घेतला होता.मी वर्गशिक्षिका म्हणून तिच्या घरची सगळी माहिती काढली.पालकांना भेटले.प्रनीताला शाळेत घेवून या सांगितले.पण प्रणिता कोणाचेच ऐकत नव्हती. एक दिवस मीच तिच्या घरी गेले.मला बघून ती लपून बसली थेट माळ्यावर. खाली काही येईना.मग मीच सीडीने जिना चढू लागल्यावर स्वतःच खाली उतरली. मग तिला मी हळुहळू बोलकी केली. शाळेची अनामिक भीती घालवली.अगदी प्रेमाने तिची विचारपूस केली.केस विंचरले.युनिफॉर्म घालायला मदत केली.खूप साऱ्या गप्पा मारल्या.
६ वी. च्या वर्गातील गमती सांगितल्या.आम्ही रोज आनंददायी शिक्षण घेतो.खेळ खेळतो.खूप मजा येते हे समजल्यावर प्रनिताचा चेहरा खुलून उठला. मग हळूच मी माझा हात पुढे केला व म्हटले ‘चल प्रनिता,आपल्या आनंदाच्या शाळेत.आपल्याला खूप सारे शिकायचे आहे.मौज मस्ती करायची आहे.’ आणि खरच प्रनितानेही हळूच तिचा हात माझ्या हातात दिला. व दप्तर घेवून माझ्याबरोबर शाळेची वाट चालू लागली. आणि सहजच मी गाणे गुणगुणलें, ‘आली आली आली पारू शाळेला , शिक्षणाचा शुभारंभ झाला.’.
लेखिका_ माधवी मारुती पाटील
पदवीधर शिक्षिका शाळा कुडली नंबर ४