चिपळूण – वृद्ध महिलेला गाडीत बसवून सोन्याचा दागिना जबरदस्तीने चोरणाऱ्या दरोडेखोर टोळक्याला चिपळूण तालुक्यातील अलोरे शिरगांव पोलीसांनी पाठलाग करून पकडले. त्यामुळे शिरगाव पोलिसांच्या कामगिरीचे कोतुक होत आहे.
आज सकाळी अलोरे शिरगांव पोलीस ठाणे हद्दीमधील चिपळूण अर्बन को- ऑपरेटीव्ह बँक मधील असणाऱ्या आपल्या खात्यामधील फॅमिली पेंशनची काही रक्कम काढण्यासाठी मुंढे, चिपळूण येथील राहणाऱ्या 65 वर्षीय जेष्ठ नागरिक महिला आपल्या वाडीतील राहणाऱ्या अन्य एका जेष्ठ नागरिक महिले सोबत मुंढे एस.टी. स्टॉप वर शिरगांवला जाण्यासाठी वाट पहात असताना एक पोपटी हिरव्या रंगाची कार त्यांच्या बाजूला येऊन थांबली गाडी मधील बसलेल्या चालकाने तुम्हाला कुठे जायचे आहे. असे विचारून त्यांना गाडीत पुढे बसण्यास सांगितले व गाडीत पुरेशी जागा नसल्याचे सांगून सोबत असलेल्या जेष्ठ नागरिक महिलेस गाडी मध्ये घेतले नाही व काही अंतरावर गेल्यावर गाडी मधील बसलेल्या एका महिलेने तसेच एका इसमाने त्यांच्या गळ्यातील ₹93500/- किंमतीची सोन्याची माळ जबरदस्तीने जिवे मारण्याची धमकी देऊन व मारहाण करून हिसकावून काढून घेतली तसेच शिरगांव येथील ब्राह्मणवाडी जवळ त्यांना गाडीतून खाली उतरविण्यात आले.मुंढे, चिपळूण येथे राहणाऱ्या या 65 वर्षीय जेष्ठ नागरिक महिलेने लागलीच मागून येणाऱ्या एस. टी. बस ने अलोरे शिरगांव पोलीस ठाणे गाठले व आपली तक्रार देऊन सदर गाडीचा नंबर 1657 असल्याचे व यातील असणाऱ्या व्यक्तींचे वर्णन पोलीसांना सांगितले.या मिळालेल्या माहितीच्या आधारे अलोरे पोलीसांमार्फत लागलीच नाकाबंदी करण्यात आली आणि शिरगाव पोलिस ठाण्याचे सपोनी सुजित गडदे,पो हेड कॉन्स्टेबल गणेश नाळे,पोलिस शिपाई राहुल देशमुख, व महिला होमगार्ड विजया चिपळूणकर यांनी गाडीचा पाठलाग करून कुंभार्ली घाटामध्ये शिताफीने गाडी व गाडीतील संशयतिना पकडले यामध्ये सूरज समाधान काळे, सरस्वती सूरज काळे, राहुल अनिल शिंदे, कामिनी राहुल शिंदे, वय 32 रा. सारोळे, या चारही जणांना त्यांच्या गाडी सह ताब्यात घेण्यात आले व त्यांच्या विरुद्ध अलोरे पोलीस ठाणे येथे गुन्हा दखल करण्यात आला