चिपळूण –राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार शेखर निकम अजित पवार गटात गेल्यामुळे चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे नुकसान झाले आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे चिपळूण तालुकाध्यक्ष प्रशांत यादव यांनी दिली आहे.
गुहागर -विजापूर मार्गासाठी भूसंपादन केलेल्या जमीन मालकांना मोबदला द्या. या मागणीसाठी चिपळूण काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत यादव यांच्या मार्गदर्शनाखाली शिष्टमंडळाने प्रांताधिकारी आकाश लिगाडे यांना निवेदन दिले.
यावेळी गेल्या वर्षभरापासून राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडत आहेत गेल्या चार दिवसांपूर्वी राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली असून चिपळूण- संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे आमदार शेखर निकम हे अजित दादा पवार गटात गेले आहेत. या पार्श्वभूमीवर चिपळूण काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत यादव यांची प्रतिक्रिया जाणून घेतली असता ते म्हणाले की, आमदार शेखर निकम अत्यंत जबाबदार आमदार आहेत. निकम यांच्या निर्णयामुळे चिपळूणमध्ये महाविकास आघाडीला धक्का बसला आहे. ते अजित पवार गटात गेल्यामुळे त्याचे होणारे परिणाम महाविकास आघाडीसाठी चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघात अडचणीचे ठरणार असल्याचे स्पष्ट केले.
यावेळी शहराध्यक्ष लियाकत शाह, माजी नगरसेवक कबीर काद्री, माजी नगरसेविका सफा गोठे, काँग्रेस महिला आघाडी तालुकाध्यक्ष निर्मला जाधव, शहराध्यक्ष श्रद्धा कदम, अल्पसंख्यांक सेल तालुकाध्यक्ष अनवर जबले, युवक काँग्रेस शहराध्यक्ष फैसल पिलपिले, अ. ल. माळी, शमून घारे, मोहन मोरे राकेश दाते, इम्तियाज कडू आदी उपस्थित होते.