बातम्या शेअर करा

गुहागर – गुहागर तालुक्यातील कोडंकारुळ येथील चोवीस वर्षे तरुण युवकाचा बुडून मृत्यू झाल्याने या परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

प्रज्योत मेहता राहणार जागकरवाडी ,कोंडकारुळ
हा आपल्या मित्रांसमवेत साखरीआगर येथील तलावामध्ये पोहण्यासाठी गेला होता. त्याच्या समवेत एकूण पाच जण होते. ज्यावेळी हे तलावात होण्यासाठी उतरले त्याचवेळी प्रज्योतने पाण्यामध्ये उडी मारली पण तो काही पुन्हा काय वर आला नाही त्यानंतर आपला मित्र पाण्याचा बाहेर येत नाही असे पाहतात त्याच्यासोबत असलेल्या मित्रांनी पाण्यातून त्याला वर काढले तसेच पोटातील पाणी काढण्याचा प्रयत्न केला मात्र तो कोणतीच हालचाल करत नव्हता तात्काळ त्याला हेदवी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तेथील डॉक्टरांनी तो मयत असल्याचे घोषित केले या घटनेची माहिती मिळतात गुहागर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सचिन सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली लुकमान तडवी ,किशोर साळवी यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. गुहागर पोलीस सध्या या प्रकरणाबाबत अधिक तपास करत आहेत.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here