…….अखेर त्यांनी करून दाखवलंच……गुहागर आगारातून लांब पल्याच्या अनेक बस बंद..

0
1259
बातम्या शेअर करा

गुहागर – गुहागर आगारातून धावणाऱ्या लांब पल्याच्या अनेक बस सध्या बंद करण्यात आल्या आहेत. अपुरा कर्मचारी वर्ग, अपुऱ्या गाड्यांची संख्या ,गळक्या गाड्या ,तसेच प्रवाशांचा अल्प प्रतिसाद यामुळे या गाड्या बंद करण्यात आल्या असल्याचे आगार प्रमुख पाथरे यांनी सांगितले.

गुहागर आगारातून नित्य नियमाने धावणारी गुहागर -तुळजापूर, गुहागर -विरार, गुहागर -कोल्हापूर, गुहागर -पिंपरी चिंचवड यासारख्या अनेक लांब पल्ल्यांच्या गाड्या या गेल्या दोन दिवसापासून बंद करण्यात आल्या आहेत. गुहागर आगारात सध्या 68 बस असून 265 चालक वाहक आहेत तर दिवसभरात 344 फेऱ्या धावतात.
68 बस पैकी पाच बस या नेहमीच नादुरुस्त आहेत. त्यामुळे उरलेल्या बसेस मध्ये लांब पल्ल्यांच्या गाड्या चालवणे अशक्य होतं. तर चालक वाहकांची संख्याही कमी असल्याने काही फेऱ्या बंद कराव्या लागत आहेत. त्याचप्रमाणे शेतीची काम सर्वत्र सुरू असल्याने लांब पल्ल्यांच्या गाड्यांना उत्पन्नही मिळत नसल्याचे आगारप्रमुख पाथरे यांनी सांगितलं.

गेल्या वर्षभरापासून या लांब पल्याच्या च्या गाड्या व्यवस्थित चालू होत्या…. मग आताच काय झालं की अचानक या लांब पडल्याच्या गाड्या बंद करण्यात आल्या असा प्रश्न प्रवासी वर्ग व एसटीच्या कामगारांमधून विचारला जात आहे.

गुहागर तालुक्यातून मुंबई ,ठाणे, बोरिवली ,विरार या मार्गावर जर वीस पेक्षा जास्त खाजगी आराम बसेस चालतात तर मग गुहागर -विरार ही बस का बंद करण्यात आली असा प्रश्नही या निमित्ताने उपस्थित केला जात आहे. पश्चिम महाराष्ट्रातील तुळजापूर हे महत्त्वाचं देवस्थान या देवस्थानाला जोडणारी एकमेव गाडी ही सुद्धा गाडी जाणून-बुजून बंद केल्याचा आरोप एसटीचे कर्मचारी आणि प्रवासी करत आहेत. याच बस चा फायदा अनेकांना अक्कलकोट ,तुळजापूर ,पंढरपूर ,कराड या ठिकाणी जाण्या- येण्यासाठी आणि देवदर्शनासाठी होत होता. मात्र लांब पल्याच्या गाड्या बंद करून प्रशासन नक्की काय साधणार आहे. असा प्रश्नही त्या निमित्ताने उपस्थित केला जात आहे. कोकणातील महत्त्वाचा हे गुहागर आगर. पर्यटन स्थळ असलेल्या या गुहागर मधून लांब पल्याच्या गाड्या बंद करून येथील डेपो बंद करण्याचा घाट प्रशासन करत नाही ना..? असा प्रश्नही त्या निमित्ताने उपस्थित केला जातो. जर त्वरित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या लांब पल्याच्या गाड्या सुरू केल्या नाहीत. तर यापुढे कर्मचारी असहकार आंदोलन सुरू करणार असल्याचं सांगण्यात येत आहे…..


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here