जीएसके न्यूज, प्रगती टाइम्स, ब्रेकिंग महाराष्ट्र पुरस्कृत, जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धा

0
143
बातम्या शेअर करा

चिपळूण – (मंगेश तावडे ) – चिपळूण शहरातील अण्णासाहेब खेडेकर क्रीडा संकुलात दि.२९ आणि ३० एप्रिल रोजी जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत ब्रेक टू फिनिश, ब्लॅक टू फिनिश नोंदविणाऱ्या खेळाडूंना पहिल्या फेरीपासून पाच रोख पारितोषिके दिली जाणार आहेत. जीएसके न्यूज, प्रगती टाइम्स, ब्रेकिंग महाराष्ट्र पुरस्कृत, साई कॅरम हाऊस चिपळूण आयोजित रत्नागिरी जिल्हा कॅरम असोसिएशनच्या मान्यतेने ही स्पर्धा होत आहे.

पुरुष एकेरी, पुरुष दुहेरी, कुमार गट, कुमारी गट अशा चार गटांमध्ये ही स्पर्धा खेळवली जाणार आहे. एकेरी गटासाठी प्रत्येकी १५० रुपये पुरुष दुहेरी गटासाठी प्रत्येकी ३०० रुपये या प्रमाणात प्रवेश राहणार आहे. प्रत्येक गटात किमान ८ स्पर्धकांच्या प्रवेशिका असणे आवश्यक आहे. अन्यथा त्या गटातील स्पर्धा रद्द करण्यात येतील.

स्पर्धेत सामना खेळण्यासाठी पांढऱ्या रंगाचा टी-शर्ट, शर्ट खेळाडूने परिधान करणे आवश्यक आहे. मागाहून कोणतीही तक्रार ऐकून घेतली जाणार नाही. साईप्रकाश कानिटकर, कैलास देवळेकर यांची स्पर्धेसाठी प्रमुख पंच म्हणून निवड करण्यात आली आहे. जास्तीत जास्त खेळाडूंनी स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन साई कॅरम हाऊसचे मालक संतोष शिवगण, स्पर्धाप्रमुख दीपक वाटेकर, जिल्हा कॅरम असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप भाटकर, यांनी केले आहे.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here