ग्रीन एनर्जी कॉरिडॉरच्या योगदानाबद्दल महापारेषणला पुरस्कार

0
228
बातम्या शेअर करा

मुंबई – ईक्यू इंटरनॅशनल यांच्या वतीने पुणे येथे आयोजिलेल्या सूर्याकॉन परिषदेत महाराष्ट्र विद्युत पारेषण कंपनीला (महापारेषण) ग्रीन एनर्जी कॉरिडॉर प्रकल्पात उत्कृष्ट कामगिरीबद्दल पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. या पुरस्काराबद्दल महापारेषणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक दिनेश वाघमारे (भा.प्र.से.) यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कौतुक केले आहे.

महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीने (महापारेषण) केंद्र शासनाच्या ग्रीन एनर्जी कॉरिडॉर योजनेत सहभागी होऊन एकूण १६ अति उच्च दाब वाहिन्या (५९० सर्किट किलोमीटर) व ३६ संलग्न बे ची स्थापना करून एकूण ९३८ मेगावॅट एवढी अपारंपारिक ऊर्जा निष्कासित करण्यासाठी पारेषण मजबुतीकरणाचे काम यशस्वीरित्या पूर्ण केले आहे. या पुरस्काराबद्दल महापारेषणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक दिनेश वाघमारे म्हणाले,“महापारेषणच्या यशाचे श्रेय मी माझ्या टीमला देतो. अधिकारी व कर्मचारी यांच्या सातत्यपूर्ण कामगिरीमुळे महापारेषणला अनेक पुरस्कार मिळाले आहेत. महापारेषणने आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरली आहे. त्यामुळे भविष्यातही महापारेषणचे अधिकारी व कर्मचारी चांगले काम करतील.
सध्या राज्याची विजेची मागणी सुमारे २८ हजार मेगावॅट असून ती दिवसेंदिवस वाढत आहे. भविष्यातील वाढती विजेची मागणी पूर्ण करण्याच्या दृष्टीने वीजनिर्मिती क्षमतेत वाढ करणे गरजेचे आहे. पारंपारिक इंधनाची कमतरता लक्षात घेऊन अपारंपारिक ऊर्जा स्त्रोतांपासून वीजनिर्मितीस प्राधान्य देण्याचे शासनाचे धोरण आहे. नवीन व नवीकरणीय ऊर्जास्त्रोतांपासून वीजनिर्मितीचे अनन्यसाधारण महत्त्व लक्षात घेऊन केंद्र शासनाने अशा ऊर्जा स्त्रोतांव्दारे देशात सन २०३० पर्यंत ५०० गिगावॅट एवढा वीजनिर्मितीचा विस्तार करण्याचे उद्दिष्ट जाहीर केले आहे. त्या दृष्टीने देशभरात व राज्यात नवीन व नवीकरणीय ऊर्जा निष्कासित करून देण्यासाठी महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीव्दारे पारेषण सुविधा उपलब्ध करून देण्याची आवश्यकता असल्याने अपारंपारिक ऊर्जाप्रकल्पांच्या निर्मिती संचातून निर्माण होणारी वीज निष्काषित करण्यासाठी महापारेषणने केंद्र शासनाच्या ग्रीन एनर्जी कॉरिडॉर योजनेत सहभाग घेतला.
केंद्र शासनाने निर्धारित केलेल्या उद्दिष्टानुसार महापारेषण कंपनी सुमारे ३४०० कोटी रूपयांचे अपारंपारिक ऊर्जा निष्कासनाचे प्रकल्प प्रस्तावित करण्याच्या तयारीत आहे. हे प्रकल्प ग्रीन एनर्जी कॉरिडॉर टप्पा-३ अंतर्गत पूर्ण करण्याचे महापारेषणचे उद्दिष्ट आहे.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here