रत्नागिरी – 8 मार्च 2023 रोजी जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्या हस्ते सरकारी महिला वकील आणि महिला पोलीस अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
रत्नागिरी जिल्ह्यातील विविध न्यायालयांमध्ये दाखल केलेल्या अनेक खटल्यांमध्ये गुन्हे शाबीती करिता कायदेविषयक सहाय्य पुरविणाऱ्या तसेच सरकारी पक्षाची बाजू उत्तमरित्या न्यायालयासमोर मांडून गुन्हे शाबीतीचे प्रमाण वाढविण्यास मोलाचे सहकार्य केले म्हणून, मेघना नलावडे (विशेष सरकारी अभियोक्ता, रत्नागिरी), वर्षा प्रभू (सहाय्यक संचालक व सरकारी अभियोक्ता, रत्नागिटी), प्रज्ञा तिवरेकर (विशेष सहा. सरकारी अभियोक्ता, रत्नागिरी) आणि प्रिया लोवलेकर (कायदे तज्ञ व बाल न्याय मंडळ सदस्या, रत्नागिरी) यांचा शाल-श्रीफळ, गुलाबाचे रोप व प्रशस्तिपत्र देऊन गौरव करण्यात आला.
पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी, महिला व बालकांसंबंधी गुन्ह्यांच्या तपासादरम्यान अत्यंत संवेदनशीलतेने व सदहृदयतेने हातळणेबाबत सूचना दिल्या व रत्नागिरी जिल्ह्याचे नावलौकिक वाढवणेबाबतही आवाहन केले.
या प्रसंगी अपर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड, पोलीस अधिकारी, पोलीस अंमलदार तसेच मंत्रालयीन कर्मचारी उपस्थित होते.