गुहागर ; या सहकार सोसायटीत झाला लाखोचा घोळ…?

0
952
बातम्या शेअर करा

गुहागर -गुहागर तालुक्यातील काळसूरकौंढर येथील सहकारी सोसायटी एक मोठा फ्रॉड झाल्याची चर्चा सध्या संपूर्ण काळसूर कौंढर येथील परिसरात सुरू आहे.

काळसूर कौंढर येथील विविध सहकारी सोसायटीत 400 पेक्षा जास्त सभासद आहेत. या सोसायटीच्या सभासदांची नुकतीच एक बैठक गावामध्ये पार पडली यावेळी हा भयानक प्रकार या बैठकीत उघड झाला. गावातील याच सोसायटी मधून गावातील शेतकऱ्यांना माफक दरात कर्ज दिले जाते मात्र याच सोसायटीतील एका पदावर असणाऱ्या व्यक्तीने संचालक मंडळाला अंधारात ठेवून कर्ज घेतले असल्याची चर्चा सुरू आहे. त्याचप्रमाणे त्याच व्यक्तीने कोरोना कालावधीत ज्यावेळेला शासनाने सोसायटी वरील शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले त्यावेळेला गावातील इतर शेतकऱ्यांचे कर्ज असलेली प्रकरण तशीच ठेवून स्वतःच्या नावावरील कर्ज आणि स्वतःच्या वडिलांच्या नावावरील कर्ज माफ करून घेतल्याची चर्चा या गावात सुरू आहे. याबाबत गावातील काही व्यक्तींना विचारले असता त्यांनी आम्ही याबाबत सखोल चौकशी करत असून दोषींवर कायदेशीर कारवाई करणार असल्याचे सांगितले.

विविध सहकारी सोसायटीतील संचालक ,अध्यक्ष इतर पदाधिकारी यांना याबाबत माहिती असताना सुद्धा त्या व्यक्तीवर अद्याप का कारवाई केली जात नाही. याची चर्चा सध्या संपूर्ण गुहागर तालुक्यात सुरू आहे. जर त्या व्यक्तीने स्वतःचा फायद्यासाठी या सहकारी सोसायटीचा उपयोग केला असेल आणि शासनाने दिलेल्या कर्जमाफीमध्ये आमची कर्ज प्रकरणे तसेच ठेवून स्वतःचं आणि स्वतःच्या वडिलांच्या नावे असलेले कर्ज माफ करून घेतले असेल तर आम्ही यापुढे असलेले थकीत कर्ज भरणार नाही अशी भूमिका आता या सोसायटीमध्ये ज्यांची कर्ज आहेत त्या शेतकऱ्यांनी अशी भुमिका घेतल्याने सध्या गावापुढे एक मोठा प्रश्न उभा राहिला.

सहकारी सोसायटी म्हटलं की त्याच्यावर बँकेचे नियंत्रण असतं या सोसायटीमध्ये अध्यक्ष ,संचालक या सोसायटीचा कारभार पाहत असतात मात्र यांच्या मधला एखादा व्यक्ती संपूर्ण संचालक मंडळाला अंधारात ठेवून फक्त स्वतःचेच कर्ज काढून ते परस्पर शासनाच्या एका योजनेतून माफ करून घेत असेल तर हे संचालक मंडळ या प्रकाराला पाठीशी घालत आहे का असा प्रश्न या निमित्ताने उभा होतो.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here