पाटपन्हाळे ग्रामपंचायत निवडणूक ; कोण होणार सरपंच ? कोणाची होणार युती? चर्चेला उधाण

0
295
बातम्या शेअर करा

गुहागर – गुहागर तालुक्यातील मध्यवर्ती ठिकाणी असलेली व आर्थिक राजधानी ओळखली जाणारी पाटपन्हाळे या ग्रामपंचायतीची निवडणूक लागली आहे.

त्यामुळे आता सरपंच कोण होणार? कोणाचा पॅनल उभे राहणार? कोणाला किती मते मिळणार? याच्या चर्चा सध्या संपूर्ण शृंगारतळीत सुरू आहे.राज्यात शिंदे फडणवीस सरकारने सरपंच पदाची निवडणूक आता थेट जनतेमधून होणार असल्याचे जाहीर केल्यानंतर ग्रामीण भागातील अनेक प्रस्थापितांना धक्का बसला आहे. त्यामुळे अनेक जणांच्या सरपंच पदाचे स्वप्न अपूर्ण राहिले. या निवडणुकीत स्वताचे पॅनल उभे करून काही इच्छुक सरपंच होणार होते. मात्र त्यांच्या स्वप्नांना चुरडा झाला आहे. गुहागर तालुक्यातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या शृंगारतळी ग्रामपंचायतची निवडणूक जाहीर झाली. त्यामुळे सर्व तालुक्याचे लक्ष या ग्रा.पं. च्या निवडणुकीकडे लागले आहे. या ठिकाणी सरपंच पदासाठी ओबीसी पुरुष आरक्षण पडले असून १८ डिसेंबर रोजी इथे निवडणूक होणार आहे. सरपंच पदासाठी विद्यमान सरपंच संजय पवार पुन्हा एकदा रिंगणात उतरणार असल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहेत. संजय पवार हे महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढणार का? किंवा कोणत्या पॅनलमधून निवडणूक लढणार हे अद्याप स्पष्ट झालेले नसले तरी, संजय पवार यांना मोठा जनादार असल्याने संजय पवार नक्की कुठून निवडणूक लढवतात याची चर्चा सध्या संपूर्ण गुहागर तालुक्यात आहे. तर दुसरीकडे भाजपचे मयुरेश कोळवणकर हे सुद्धा सरपंच पदाच्या निवडणुकीसाठी तयारी करत असल्याची चर्चा आहे. जर पाटपन्हाळे ग्रामपंचायतमध्ये सर्वच पक्ष स्वतंत्र निवडणूक लढवतात किंवा आघाडी करून लढतात यावरच सर्व राजकीय गणित अवलंबून आहे.

पाटपन्हाळे ग्रामपंचायतमध्ये १३ सदस्य असून त्यात बाजारपेठ, शुंगारी मोहल्ला या भागातील मते निर्णायक मानली जातात. तसेच यावेळी अनेक नवतरुण, युवकही निवडणुकीसाठी इच्छुक असल्याने त्यांनाही संधी मिळते का? याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. त्यामुळे तालुक्यात इतर ग्रामपंचायतीपेक्षा सगळ्यात जास्त चुरस ही पाटपन्हाळे ग्रामपंचायतीमध्ये पाहायला मिळेल, असे जाणकारांचे मत आहे.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here