चिपळूण – कोकण रेल्वे मार्गावरील प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनस स्टेशनजवळ रेल्वे मार्गावरील अपग्रेडेशनच्या कामामुळे कोकण रेल्वे मार्गे धावणार्या मत्स्यगंधा तसेच नेत्रावती एक्स्प्रेसचा प्रवास पुढील जवळपास महिनाभर पनवेल स्थानकापर्यंतच करता येणार आहे.
तिरुअनंतपुरम ते मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनस दरम्यान धावणारी नेत्रावती एक्सप्रेस (16345) तसेच मंगळूर सेंट्रल ते लोकमान्य टिळक टर्मिनस (12620) या दि. 8 नोव्हेंबर ते 11 डिसेंबर 2022 या कालावधीत प्रवास सुरू होणार्या एक्स्प्रेस गाड्यांचा प्रवास मुंबईत येताना पनवेल स्थानकात संपणार आहे. याचबरोबर लोकमान्य टिळक टर्मिनस ते मंगळूर सेंट्रल (12619) मत्स्यगंधा एक्स्प्रेस दि. 11 नोव्हेंबर ते 12 डिसेंबर 2022 या कालावधीत पनवेल स्थानकातून सुटणार आहे. लोकमान्य टिळक टर्मिनस ते तिरुअनंतपुरम सेंट्रल (16345) नेत्रावती एक्स्प्रेस ही गाडी देखील दि. 10 नोव्हेंबर ते 13 डिसेंबर या कालावधीत लोकमान्य टिळक टर्मिनस ऐवजी पनवेल स्थानकातून सुटणार आहे.