चिपळूण – काँग्रेस नेते, खासदार राहुल यांच्या नेतृत्वात कन्याकुमारीहून सुरू झालेल्या भारत जोडो यात्रेला दोन महिने पूर्ण होत असतानाच ‘मुझे चलते जाना है; बस चलते जाना..!’ म्हणत निघालेले भारतयात्री नांदेड जिल्ह्यात दाखल झाले आहेत.
या यात्रेला महाराष्ट्रात देखील उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या यात्रेत चिपळूण काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत यादव यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले आहेत.काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी महागाई, भ्रष्टाचार तसेच मोदी सरकारच्या मनमानी कारभाराविरोधात भारत जोडो यात्रा गेल्या दोन महिन्यांपूर्वी कन्याकुमारीपासून सुरू केली. या यात्रेला दोन महिने पूर्ण होत असतानाच ही यात्रा महाराष्ट्रात नांदेडमध्ये दाखल झाली आहे. संपूर्ण देशभरात यांच्या या यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या यात्रेत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, ख़ासदार सुप्रिया सुळे, माजी मंत्री आ. जितेंद्र आव्हाड, माजी मंत्री आणि काँग्रेस नेते आ. सतेज उर्फ बंटी पाटील, खासदार इम्रान प्रतापगडी आदी मान्यवरांसोबत या यात्रेत चिपळूण तालुका काँग्रेसचे अध्यक्ष प्रशांत यादव, चिपळूणचे माजी उपनगराध्यक्ष व शहर काँग्रेसचे अध्यक्ष लियाकत शाह, काँग्रेसच्या अल्पसंख्याक सेलचे तालुकाध्यक्ष अन्वर जबले, युवक काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष रुपेश आवले आदी नांदेड जिल्ह्यातील या पदयात्रेत सहभागी झाले आहेत. या यात्रेच्या निमित्ताने काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले आहे. या यात्रेच्या निमित्ताने आपापल्या विभागात काँग्रेस मजबूत करण्यासाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी निर्धार व्यक्त केला आहे.