गुहागर ; नगरपंचायत करणार स्वमालकीच्या जागेत कचऱ्याचे डंपिंग

0
86
बातम्या शेअर करा

गुहागर – गुहागर येथील नगरपंचायतीने कचरा डम्पिंग ग्राऊंडसाठी नुकतीच स्वमालकीची जागा खरेदी केली आहे. गेली दहा वर्षे नगरपंचायत स्थापनेपासून शहरातील कचरा समुद्रकिनारी सुरू बनातील स्मशानभूमी शेजारील जागेत टाकावा लागत आहे.

मात्र आता स्वमालकीच्या जागेत कचऱ्याचे डंपिंग केले जाईल.गुहागरला ग्रामपंचायत असतानाची शहरातील स्वच्छता गुहागर नगरपंचायत झाल्यानंतर कायम ठेवण्यात आली आहे. शहर स्वच्छतेसाठी नगरपंचायतीचे दहा व कंत्राटी तेरा असे एकूण २३ कर्मचारी आहेत. शहरात दररोज एक टन कचरा संकलित केला जातो. यामध्ये अर्धा सुका व अर्धा ओला कचरा असतो. यासाठी तीन घंटागाड्यांमधून सहा कर्मचारी दुपारपर्यंत कार्यरत असतात. नगरपंचायतीमार्फत स्वच्छता राखता यावी यासाठी येथील अधिकारी,नगरसेवकांनी वेंगुर्ला येथील घनकचरा प्रकल्पाची पाहणी केली होती.पाच वर्षापूर्वी पवार साखरी येथे जागा घेऊन कचरा व्यवस्थापन प्रकल्प करण्याचा प्रस्ताव करण्यात आला होता; मात्र येथील ग्रामस्थांनी विरोध केल्याने हा प्रस्ताव बारगळला. कचरा व्यवस्थापन व्यवस्थित करण्यात यावे, यासाठी नुकतीच शासकीय विश्रामगृहापाठी रेव्याचे नदीशेजारी तीन एकर जागा स्वच्छ भारत अभियान अंतर्गत दोन कोटी ७५ लाख रुपयांना नुकतीच खरेदी केली आहे.या जागेमध्ये तातडीने कचरा व्यवस्थापनासाठी पत्राशेड व इतर कामासाठी ३० लाख रुपयांची निविदा काढण्यात येणार आहे. एक नोव्हेंबरपासून या ठिकाणी कचरा जमाकेला जात आहे. कचऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणात मिळणाऱ्या प्लास्टिक बाटल्यांची विल्हेवाट लावण्यासाठी नगरपंचायतीने पाच लाखांचे प्लास्टिक क्रश कॉम्पॅक्ट मशीन बसवले होते.याबाबत नगराध्यक्ष राजेश बेंडल यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की गुहागर शहर हे तालुक्याचे ठिकाण आहे. तसेच पर्यटनदृष्ट्या विकसित होत आहे. त्यामुळे स्वच्छतेवर अधिक भर दिला जातो. नगरपंचायतीच्या माध्यमातून स्वच्छतेबरोबरच समुद्रकिनारा तसेच ग्रामस्थ व सामाजिक संस्थांबरोबर राहून नगरपंचायत स्वच्छता अभियान यामध्ये कायम सातत्याने अग्रेसर आहे.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here