मुंबई – महाराष्ट्र राज्य शिक्षण बोर्डाच्यावतीने फेबुवारी-मार्च २०२० रोजी घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल उद्या (१६ जुलै) दुपारी १ वाजता ऑनलाईन जाहीर होणार आहे. ही घोषणा बोर्डाने केली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनची मुदत वाढत गेल्याने बारावीच्या परिक्षेचा निकाल रखडला होता. पण आता निकालाची प्रतीक्षा संपली असून उद्या हा निकाल ऑनलाईन पाहता येणार आहे. परीक्षेस बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय गुण बोर्डाच्या वेबसाईटवरून पाहता येणार आहेत. तर त्याची प्रिंटही घेता येणार आहे. बारावीच्या परीक्षेचा निकाल उद्या (१६ जुलै) दुपारी १ वाजता मंडळाच्या www.mahresult.nic.in, www.hscresult.mkcl.ord, www.maharashtraeducation.com, www.mahresult.nic.in या अधिकृत संकेतस्थळांवर ऑनलाईन पाहता येईल. त्याचबरोबर कनिष्ठ महाविद्यालयांना एकत्रित निकाल www.mahahsscboard.in या वेबसाईटवर पाहता येईल.