रत्नागिरी – आज सायंकाळपर्यंत प्राप्त अहवालांमध्ये 89 नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे एकूण पॉझिटिव रुग्णांची संख्या 1049 झाली आहे. दरम्यान, 21 रुग्णांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले. जिल्ह्यात बरे झालेल्यांची संख्या 655 झाली आहे. आज बरे झालेल्यांमध्ये घरडा येथून 1, जिल्हा कोव्हिड रुग्णालयातून 4, कोव्हिड केअर सेंटर, पेढांबे येथून 13 आणि 3 समाजकल्याण रत्नागिरीमधील आहेत.
पॉझिटिव्ह रुग्णांचे विवरण खालीलप्रमाणे
रत्नागिरी 13, कळबणी 17,घरडा, खेड 20, संगमेश्वर 3,
कामथे 19, गुहागर 10, दापोली 7 आडे, दापोली येथील 62 वर्षीय महिला कोरोना रुग्णांचा आज उपचार दरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे कोरोना बाधित मृत्यूंची संख्या आता 34 झाली आहे.
एकूण पॉझिटिव्ह – 1049
बरे झालेले – 655
मृत्यू – 34
उपचारात – 360