मुंबई – राज्यात थेट जनतेतून नगराध्यक्ष आणि सरपंच निवडून देण्याचे विधेयक आणणाऱ्या राज्य सरकारवर शिवसेनेचे नेते आमदार भास्करराव जाधव यांनी जोरदार हल्ला चढवला.
विशेषतः त्यांनी एकनाथ शिंदे गटावर जास्त तोंडसुख घेतलं एकनाथराव शिंदे तुम्ही नाव शिवसेनेचे घेता आणि सर्व निर्णय आणि कार्यक्रम मात्र भाजपचे राबवत आहे असं त्यांनी म्हटलं सरकार स्थापन झाल्यापासून गेल्या दीड दोन महिन्यातील असा एक निर्णय दाखवा की जो तुम्ही स्वतःच्या मनाने घेतला आहे आधी तुम्हीच घेतलेली सर्व निर्णय भाजप तुमच्याकडून बदलून घेत आहेत वेळी सावध व्हा जरा कारभार करायचा तर स्वाभिमानाने करा सत्तेची गरज फक्त तुम्हाला नाही त्यांनाही आहे त्यांनाही सत्तेत यायचं होतं भाजप कितीही नाही म्हणत असेल तरी ते सत्तेच्या बाहेर राहून पाण्याबाहेर असणाऱ्या माझ्यासारखे तडफडत होते असा हल्लाबोल भास्कर जाधव यांनी केला
विधानसभेत विधेयकावर चर्चा करत असताना भास्कर जाधव यांनी हा हल्लाबोल केला आहे त्यावेळी शंभूराज देसाई किमान स्वतःच्या मनाने विचार करा प्रत्येक गोष्टीत तुम्ही तोंड घालून स्वतःचा हस करून घेऊ नका काव काव काय मला वाटलं आता पितृपक्ष येणार आहे. प्रॅक्टिस करतोय की काय गडी असं वाटलं अशी भोचरी टीका भास्कर जाधव यांनी केली.