गुहागर – गुहागर तालुक्यातील पोमेंडी फाटा येथे बॉक्साईड वाहतूक करणाऱ्या चालत्या १६ टायरच्या ट्रकला रविवारी रात्री १२ वाजता अचानक भीषण आग लागली.
ही आग इतकी भीषण होती की, यामध्ये ट्रक पूर्णपणे जळून खाक झाला. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. गेलेकाही महिने यामार्गावरुन बॉक्साईड वाहतूक सुरू असल्याची चर्चा सुरू आहे. दरम्यान, रविवारी रात्री १२ वाजण्याच्या सुमारास अशाच प्रकारे बॉक्साईड वाहतूक करत असताना पोमेंडी फाटा याठिकाणी ट्रकला भीषण आग लागून त्यामध्ये संबंधित ट्रक जळून पूर्णपणे खाक झाला. या वाहतुकीबाबत सर्व स्तरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.