गुहागर – गुहागर तालुक्यातील वेळणेश्वर समुद्रकिनारी स्फोटक सदृश्य वस्तू आढळल्याने या परिसरात खळबळ माजली आहे.
वेळणेश्वर समुद्रकिनारी आज सकाळी वेळणेश्वरचे माजी सरपंच नवनीत ठाकूर हे फेरफटका मारत असताना त्यांना समुद्राच्या किनाऱ्यावर एक बंद बरणी दिसली त्या बंद बरणीची नीट पाहणी केली असता त्या बंद
बरणीमध्ये स्फोटक सदृश्य वस्तू असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तात्काळ याबाबत गुहागर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक जाधव यांना याबाबतची माहिती दिली. त्यानंतर जाधव यांनी आपल्या कर्मचाऱ्यांचासह तात्काळ वेळणेश्वर समुद्रकिनारा गाठला. आणि त्या बरणीची पाहणी केली त्या बरणीमध्ये असलेली वस्तू ही जहाजावरील हॅन्ड हेल्ड रॉकेट पॅरॅशूट असल्याचे त्यांच्या लक्षात आले त्यावेळी त्यांनी त्वरित रत्नागिरी येथील बॉम्ब शोध नाशक पथक आणि श्वान पथक यांना त्वरित पाचारण केलं त्यानंतर त्या पथकाने वेळणेश्वर येथील समुद्रकिनारी ती वस्तू मोकळ्या जागेत निकामी केली. अशाप्रकारे गुहागरच्या समुद्रकिनाऱ्यावरील स्फोटक वस्तू त्वरित पोलिसांच्या निदर्शनास आणून देणारे माजी सरपंच नवनीत ठाकूर यांचा सध्या सर्वत्र कौतुक होत आहे.तसेच यावेळी गुहागरचे पोलीस निरीक्षक जाधव,Api जाधव ,Psi कांबळे,विशाल वायगणकर,वैभव चौगले,कुमार घोसाळकर,आशिष फुटक, आधी पोलीस कर्मचारी उपस्थित होते.
समुद्रामध्ये मोठ्या जहाजावर ज्या वेळेला एखादे संकट येतं त्यावेळेला आपण कोणत्या ठिकाणी आहोत हे दाखवण्यासाठी किंवा दर्शवण्यासाठी हॅन्ड हेल्ड रॉकेट पॅरॅशूट चा वापर केला जातो. हे त्यावेळी हवेमध्ये उडवून त्याचा स्फोट घडवून आपण या ठिकाणी आहोत हे दर्शवण्यासाठी त्याचा उपयोग होतो.