चिपळूण – पत्रकार उत्कर्ष समिती महाराष्ट्रकडून राज्यस्तरीय पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. यावेळी गुहागर येथील पत्रकार लक्ष्मीकांत घोणसेपाटील यांना उत्कृष्ट इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
हा पुरस्कार दि 12 जुन रोजी पनवेल येथे होणाऱ्या कार्यक्रमात प्रदान करण्यात येणार आहे. पत्रकार उत्कर्ष समिती महाराष्ट्रकडून राज्यस्तरीय पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. यावेळी पनवेल येथील वरिष्ठ पत्रकार व दैनिक वादळवाराचे संपादक विजय कडू यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्याचे सर्वानुमते ठरले. तसेच दैनिक संध्याकाळच्या संपादिका रोहिणी खाडिलकर पोतनीस व दैनिक प्राऊडचे संपादक उमेश गुजराती यांना जाहीर करण्यात आला. तर गुहागर येथील पत्रकार लक्ष्मीकांत घोणसेपाटील यांना इलेक्ट्रॉनिक मीडियाचा पुरस्कार जाहीर करण्यात आला. पत्रकार क्षेत्रात काम करणारे आणि सामाजिक बांधिलकी जोपासणारे गुहागर येथील पत्रकार लक्ष्मीकांत घोणसेपाटील यांची अनेक पत्रकारांन मधून निवड करण्यात आली आहे. त्यांनी आतापर्यंत केलेली उकृष्ट कामगिरी आणि 2022 साली चिपळूण मध्ये आलेल्या महापुराच्या वेळी त्यांनी अनेक अशा घटना समाज्या पुढे आणल्या आणि एक वेगळाच पत्रकारितेत ठसा उमटवला त्यावेळेला त्यांनी केलेल्या सहा विशेष स्टोरी ना Tv 9 मराठी कडून विशेष गौरवण्यात आलं होतं. तसेच त्या वेळेला पुरामध्ये अडकलेल्या अनेक कुटुंबाला विशेष मदतही केली होती.त्यांच्या या कामाची दखल घेत हा पुरस्कार जाहीर करण्यात आला.या आधी गेल्या वर्षी 2021 मध्ये सुद्धा त्यांना राज्यस्तरीय पुरस्कार मिळाला आहे. मुंबई पनवेल येथे 12 जुन रोजी होणाऱ्या कार्यक्रमात हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात येणार आहे. त्यांच्या निवडीबद्दल अनेकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. त्याचबरोबर शुभेच्छा दिल्या आहेत.