तिरूपती – भारत देशातील सर्वात श्रीमंत देवस्थान तिरुमला तिरुपती देवस्थान या देवस्थानाने आजपासून सर्व दर्शन हे सर्वसामान्यांसाठी खुले केले आहे. या दर्शनासाठी या आधी टोकन दर्शन सुविधा अवलंबली जात होती.
मात्र आजपासून टोकन दर्शन सुविधा बंद करण्यात आली असून येणाऱ्या प्रत्येकाला दर्शन देण्यात येणार आहे. असा निर्णय तिरुमला तिरुपती देवस्थान या समितीने घेतला आहे.कोराना नंतरच्या महामारी नंतर अनेक भाविक पुन्हा एकदा तिरुपतीच्या दर्शनाला येत आहेत या भाविकांचे अडचण होऊ नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.