गुहागर – गुहागर तालुक्यातील शुंगारतळी येथे रस्त्यालगत नवीन हॉस्पिटल उभारण्याच्या नावाखाली तेथून वाहणाऱ्या नदीच्या पात्रातच इमारतीचे बांधकाम केले जात आहे. अशा प्रकारच्या अनधिकृत बांधकामाला कोणी परवानगी दिली गेली आहे का? तसेच महसूल विभाग याविषयी अनभिज्ञ आहे का? हा संभ्रम निर्माण होत आहे.
गुहागर तालुक्यातील शुंगारतळी हे महत्वपूर्ण असे ठिकाण आहे. यापरिसरात हा असा प्रकार सुरू असताना महसूल विभाग मात्र गप्प का ? याबाबत शंका निर्माण होत आहे. तसेच या इमारतीच्या आजूबाजूला इतर इमारतीचे बांधकाम सुरू झाले आहे. नदीच्या पात्रात बांधकाम करणे व नदीकाठी मोठी इमारत बांधण्यास कोणी आणि कशी परवानगी दिली अशा चर्चांना उधाण आले आहे.नदीमध्ये बांधण्यात येणार्या या बांधकामाची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे गुहागर तालुका अध्यक्ष विनोद जानवळकर यांनी केली आहे.गुहागर तालुक्यातील अनेक अनधिकृत बांधकामे तसेच वाळू चोरी धंदे ज्याप्रकारे महसूल विभागाने बंद केले, त्याचप्रकारे शुंगारतळी व गुहागर तालुक्यातील अनधिकृत बांधकामावर देखील कारवाई करावी अशी मागणी सर्वसामान्य नागरिक करत आहेत. तर याच शुंगारतळी तलाठी आणि सर्कल यांना अद्यापही या अनधिकृत बांधकामाबाबत कल्पना नसल्याने ‘दया कुछ तो गडबड है ‘अशी चर्चा सध्या सर्वत्र गुहागर तालुक्यात सुरू आहे.