गुहागर – गुहागर तालुक्यातील शृंगारतळी येथे जागतिक महिला दिनानिमित्त द कुटे ग्रुप व मालाणी मार्ट यांच्या संयुक्त विद्यमानाने तिरूमला ब्युटी क्वीन 2022 फॅशन शो स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
या स्पर्धेमध्ये महाराष्ट्रीयन वेशभूषा असणाऱ्या महिलांमधून तीन महिला निवडल्या जातील तसेच साउथ इंडियन वेशभूषा असणाऱ्या महिलांमधून तीन महिला निवडल्या जातील वेस्टन वेशभूषा असणाऱ्या महिलांमधून तीन महिला निवडल्या जातील आणि या सर्व महिला एकत्र करून या नऊ महिलांमधून तीन महिला या फायनल विजेता म्हणून प्रश्नमंजुषा कार्यक्रम घेऊन निवडल्या जातील व विजेत्या महिलांना सोन्याची नथ बक्षीस म्हणून देण्यात येणार आहे*
या कार्यक्रमांमध्ये सर्व महिलांना मोफत प्रवेश आहे. हा कार्यक्रम शृंगारतळी येथील भवानी सभागृह मंगल कार्यालय मध्ये आठ मार्च रोजी दुपारी तीन वाजता होणार आहे. तरी जास्तीत जास्त महिलांनी यात सहभागी व्हावे असे आवाहन कूटे ग्रुपचे अमेय बोनकर, सौ. पूजा कनगुटकर व मालाणी मार्टचे सेल्स ऑफिसर समीर गुरव व मालक नदीम मालाणी यांनी केले आहे.