चिपळूण -चिपळूण तालुक्यात ओमिक्रॉनने शिरकाव केला नसला तरी कोरोनाने पुन्हा डोषक वर काढण्यास सुरुवात केली आहे.चिपळूण तालुक्यात गेल्या चार दिवसात कोरोनाचे तब्बल ५१ नवीन रुग्ण आढळून आले आहे. चिंतेची बाब म्हणजे परदेशातून दाखल झालेल्या दहाजणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यापैकी तिघांचे नमुने ओमिक्रॉनच्या धर्तीवर पुणे येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.
शहरातही कोरोनाबाधितांची संख्या वाढत चालली असून आतापर्यंत १९ जण कोरोना पॉझिटिव्ह सापडले आहेत. दरम्यान, गोवळकोट येथील एका शाळेतील विद्यार्थिनीला कोरोनाचा संसर्ग झाल्याने खबरदारीचा उपाय म्हणून गेले तीन दिवस ही शाळा बंद ठेवण्यात आली आहे.
कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर तालुक्यातील जनजीवन सुरळीत सुरु झाले आहे. मात्र सरत्या वर्षात कोरोनाबाधितांची रुग्ण संख्या पुन्हा वाढू लागली आहे. त्यातच ओमिक्रॉनच्या नव्या व्हेरिएंटमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. चिपळूण तालुक्यातही दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे चित्र आहे. गेल्या चार दिवसात तालुक्यात ५० नवे बाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी १९ रुग्ण चिपळूण शहर परिसरातील आहेत. यामध्ये पेठमाप३, गोवळकोट१, दादर मोहल्ला व जुमा मस्जीद ४, बहादूरशेख मोहल्ला ४, पाग- कास्करआळी-देसाई बाजार परिसरात ४, खेंड ३ असे शहरातील रुग्णांचा समावेश आहे. यामध्ये चिंतेची बाब म्हणजे ३ ते ४ कुटुंबात बाधितांची संख्या आहे.
अलिकडच्या काळात चिपळूर तालुक्यात ५८० नागरिक परदेशातून दाखल झाल आहेत. त्यापैकी सुमारे १० जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यापैकी तिघाजणांचे नमुने पुणे येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. ओमिक्रॉन व कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमीवर येथील तालुका आरोग्य विभाग व पालिकेच्या आरोग्य विभाग सतर्क झालाआहे. परदेशातून तालुक्यात दाखल होणाऱ्या नागरिकांची माहिती घेऊन त्यांची कोरोना चाचणी केली जात आहे. याशिवाय तालुक्यात आरटीपीसीआर व ॲन्टीजेन चाचण्यांची संख्याही वाढविण्यात आली आहे.