पुन्हा अंबाघाट येथे दरड कोसळल्याने वाहतूक बंद ….

0
148
बातम्या शेअर करा


साखरपा – रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावरील अंबाघाट येथे दरड कोसळल्याने वाहतूक बंद झाली आहे. परतीचा पाऊस जोरदार सुरू असल्यामुळे ही दरड कोसळली आहे.
दख्खन गावा जवळ ही दरड कोसळली आहे.सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या वतीने ही दरड हटवण्याचे काम सुरू आहे.मात्र किती वेळ लागेल हे अनिश्चित आहे. त्याचप्रमाणे अवजड वाहतूक बंद असताना पुन्हा एकदा आंबा घाट कोसळल्याने वाहनधारकांची पंचायत झाली आहे.
सर्वच प्रकारची वाहतूक बंद झाली आहे.पोलीस प्रशासन ,सार्वजनिक बांधकाम विभाग या परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहेत.त्यामुळे वाहतूक केव्हा सुरू होईल हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. साखरपा येथे गावाकडे जाणारी तर आंबा गावात रत्नागिरीकडे येणारी वाहने थांबवण्यात आली आहे.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here