चिपळूण – (सुकन्या घोणसेपाटील ) – म्हणतात ना देव तारी त्याला कोण मारी असाच काहीसा प्रत्ययाला आला चिपळूण वासियांना या महापुरात एका बिल्डिंग मधून एक जण टेरेसवर चढत असताना हात सुटून खाली पडतो आणि त्यानंतर तो व्हिडिओ संपूर्ण सोशल मीडियावर वायरल होतो. तो व्यक्ती कोण? ती बिल्डिंग कोणती ?त्या व्यक्तीचे पुढे काय झालं ?जी व्यक्ती वाचली की नाही? असे अनेक प्रश्न चिपळूणकरांना सह अनेकांना पडले मात्र टीव्ही नाईनच्या टीमने त्या व्यक्तीला शोधून काढत त्या व्यक्तीच्या बाबतीत घडलेला प्रसंग जाणून घेतला…….
होय तो व्हिडीओ आणि ती व्यक्ती चिपळूण शहरातीलच आहे. चिपळूण शहरातील भोंगाळे परिसरातील डायमंड कॉम्प्लेक्स मधील आहे. डायमंड कॉम्प्लेक्सच्या तळमजल्यावर एका गॅरेजमध्ये काम करणारे सुधीर भोसले वय वर्षे जवळपास 45 त्यादिवशी पहाटेच्या वेळी चिपळूणमध्ये महापूर आला आणि बघता बघता त्यांच्या गळ्यापर्यंत पाणी आले त्याच वेळी त्यांनी आपल्या बिल्डिंगमधील अस्लम मालगुंडकर सह सहकाऱ्यांना फोन करून आपल्याला वाचविण्याची विनंती केली यावेळी बिल्डिंगच्या चारी बाजूला दहा फुटांपेक्षा जास्त पाणी होतं त्यामुळे बिल्डिंगमधील ग्रामस्थांनी सुधीर भोसले यांना वाचविण्यासाठी नामी शक्कल लढवली त्यांनी बिल्डिंगच्या टेरेसवरून टायरच्या साह्याने दोरखंड टाकला आणि सुधीर भोसले यांना पाण्यातून वर घेण्यास सुरुवात केली त्याच वेळी सुधीर भोसले यांची स्वान (कुत्री )स्वीटी ही सोबत होती. आपल्या सोबत आपल्या स्वीटीचा जीव वाचावा म्हणून त्यांनी स्वीटीला सोबत घेतलं दोरखंडाच्या साह्याने टेरेस पर्यंत आले मात्र त्याचवेळी त्यांचा हात जड झाल्यामुळे शेवटच्या क्षणी त्याने स्वीटी ला आपल्या सहकार्याने कडे दिले आणि त्यांचा तोल गेला आणि ते पाण्यात पडले मात्र पुढच्या वेळेला नागरिकांनी त्यांना पुन्हा एकदा दोरखंडाने टायर टाकून सुखरूप बाहेर काढले त्यामुळेच देव तारी त्याला कोण मारी त्याचा प्रत्यय पुन्हा एकदा चिपळूण वासीयांनी अनुभवले.