चिपळूण ; पुरग्रस्त सभासदांना चिपळूण नागरी पतसंस्थेमार्फत मदतीचा हात -सुभाष चव्हाण

0
389
बातम्या शेअर करा

चिपळूण – चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थे मार्फत पुरग्रस्तांना प्रचलीत व्याजदरापेक्षा कमी व्याजदरात कर्ज पुरवठा उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याची माहीती अध्यक्ष सुभाष चव्हाण यांनी दिली.

गेल्या आठवडयातील अतीवृष्टीमुळे चिपळूण, खेड, संगमेश्वर , राजापूर सह जिल्हयामधील अन्य तालुक्यात व्यापारी, लहान मोठे उद्योजक तसेच वाहन धारक, सर्वसामान्यांना मोठया आसमानी संकटाचा फटका बसला आहे . चिपळूण शहरातील परिसरातील सर्व भाग मोठया प्रमाणावर पूर क्षेत्राखाली आला आहे . या सर्वाना मदतीचा हात देण्यासाठी चिपळूण नागरी पतसंस्था आपल्या ” आपली माणसे , आपली संस्था ” हया ब्रीद वाक्याला साजेसे असे सामाजीक बांधीलकी जपण्याची परंपरा कायम ठेवून एक वेगळा ठसा समाजामध्ये निर्माण करणार आहे . नैसर्गिक आलेल्या हया संकटात चिपळूण शहरातील तसेच जिल्हयामधील हया आपत्तीमध्ये बाधीत झालेल्या संस्थेच्या सभासदांना संस्थेमार्फत अन्नधान्याचे किट घरपोच देण्यात येणार आहे . यासाठी संस्थेच्या कर्मचा – यांनी एक दिवसाच्या पगाराची रक्कम बाजुला काढून संस्थेच्या माध्यमातुन हे वाटप करण्यात येणार आहे. याअगोदर संस्थेने ” मुख्यंमत्री सहाय्यता निधी ” ला कोरोना काळात १ कोटीची मदत तसेच संस्थेच्या कर्मचा – यांनी ४ लाखाची भरघोस रक्कम दिली आहे . तसेच ऑगस्ट २०१ ९ ला कोल्हापूर जिल्हया मधील आलेल्या पुरामध्ये पुरग्रस्त झालेल्या आंबेगाव या गावाला संस्थेच्या कर्मचा – यांनी आपल्या दोन दिवसाच्या पगारामधुन जिवनावश्यक वस्तुची मदत केली होती . माहे ऑगस्ट २०१ ९ रोजी महाराष्ट्र राज्याच्या दुष्काळग्रस्त भागातील पीडीत बांधवांना आर्थिक मदतीची शासनाने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देऊन ” मुख्यंमत्री सहाय्यता निधी ” ला रक्कम रु .१० लाखाचा धनादेश अदा करणेत आला . हया मधुन संस्थेने वेळोवेळी आपली सामाजीक बांधीलकीची जाणीव ठेवुन काम केले आहे, अशी माहिती अध्यक्ष सुभाष चव्हाण यांनी दिली आहे . सर्व पुरग्रस्त सभासदांना आवाहन करण्यात येते आहे की या सर्व योजनांच्या माहितीसाठी आपल्या नजीकच्या शाखेमध्ये किंवा संस्थेच्या प्रधान कार्यालयाकडे संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here