चिपळूण – ( सुकन्या घोणसेपाटील ) – चिपळूण मधील महाप्रलयानंतर अनेक अशा भीषण घटना समोर येत आहेत. त्यातच 24 तास पाण्यात झाडावर व बसवर ज्याने काढले त्या केतन देवळेकर याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर होतोय.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये केतन देवळेकर हा प्रथम पाण्यात बुडत असताना गॅरेजमधील बसच्या टपावर चढला आहे तिथून मदतीची मागणी करतोय आणि त्यानंतर आपला जीव वाचवण्यासाठी त्यांनी तेथील शेजारील झाडाचा आसरा घेतला त्यावेळेस स्थानिकांनी त्यांना वाचवण्यासाठी अनेक शासकीय यंत्रणा फोन केले मात्र त्यावेळी पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने शासकीय यंत्रणा त्याच्या मदतीसाठी पोचू शकले नाही. मात्र शेवटपर्यंत आपल्याला जगायचं असे स्वतःला समजवत त्याने 24 तास झाडावर बसून राहिला दुसऱ्या दिवशी पहाटे पाणी कमी झाल्यावर केतन त्या झाडावरून खाली उतरला आणि अशाप्रकारे त्या थरारक महाप्रलयातून केतनने आपला जीव वाचवला
केतन हा सर्वसामान्य घरातील व्यक्ती ज्या ठिकाणी रोजगार करतो त्याच गॅरेजमध्ये राहायचा मार्कंडी मधील गॅरेजमध्ये केतन काम करतो त्याच गॅरेजमध्ये राहत होता त्या दिवशी अचानक रात्री पाणी भरलं आणि संपूर्ण गॅरेज पाण्याने वेढले गेले त्यावेळी आपला जीव वाचवा म्हणून त्यांनी गॅरेजमध्ये आलेल्या एका खाजगी बसचा आणि झाडाचा आसरा घेतला होता.