चिपळूण ; दादा, तुम्ही कोकणासाठी दैवत आहात, तुम्हीच न्याय देऊ शकता; चिपळूणच्या व्यापाऱ्यांचं नारायण राणेंना साकडं

0
283
बातम्या शेअर करा

चिपळूण- दादा, तुम्ही कोकणाचे दैवत आहात. तुम्हीच न्याय देऊ शकता, असं म्हणत या चिपळुणच्या व्यापाऱ्यांनी केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांच्यासमोर व्यथा मांडल्या. या वेळी राणेंनीही सर्वोतोपरी मदत करण्याचं आश्वासन या व्यापाऱ्यांना दिले.

केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी आज तळीये येथील दुर्घटनाग्रस्त भागाची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी चिपळूणच्या बाजारपेठेत येऊन पूर परिस्थितीची पाहणी केली. यावेळी व्यापाऱ्यांनी नारायण राणे यांना गराडा घातला आणि आपलं गाऱ्हाणं मांडलं. दादा, तुम्ही कोकणासाठी दैवत आहात. तुम्हीच आम्हाला न्याय मिळवून देऊ शकता. आमचं सर्व काही पुरात वाहून गेलं आहे. आमचं कंबरडं मोडलं आहे. आम्हाला तातडीने मदत करा, अशी मागणी या व्यापाऱ्यांनी केली. तसेच, अलोरा येथे काही नियोजन केल्यास पुराचं पाणी समुद्राज जाऊ शकतं. त्यामुळे पुराचा प्रश्न कायमचा सोडवला जाऊ शकतो, असं या व्यापाऱ्यांनी राणेंना सांगितलं.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here