चिपळूण – गुहागर -विजापुर या राष्ट्रीय महामार्गावरून चिपळुण कडून गुहागर कडे गोवा बनावट मदयाची वाहतूक होणार असल्याची गुप्त माहीती प्र.अधीक्षक व्हि. व्हि. वैदय यांना मिळाली होती त्यानुसार सापळा रचून कारवाई केली असता यामध्ये मोठा गोवा बनावट मध्य विक्री करणारे मोठे रॅकेट उघडकीस आले.
चिपळुण येथून गुहागर तालुक्यातील सुरळ या ठिकाणी हुंडाई क्रेटा कार मधून विदेशी दारू येत असल्याची माहिती मिळताच ती गाडी समोर येताच थांबविली असता त्यामध्ये गोवा राज्य बनावट मदयाचे 36 बॉक्स आढळून आले. त्यामध्ये गोवा राज्यातील मद्य व वाहनासह रु. 14,46,000/- किंमतीचा मुददेमाल जप्त करण्यात आला आहे. सदर वाहनामधील संशयीत आरोपी विपुल कांबळी पागनाका व शुभम चव्हाण यांना ताब्यात घेतले व त्यांचेकडे चौकशी केली असता त्यांनी सदर वाहतुकीसाठी आम्हाला चिपळूण मधील व्यक्ती मदत करत असल्याचे सांगितले. त्यानुसार त्यांचा साथीदार अमेय यास ताब्यात घेण्यात आले. चिपळूण मधील या तीन आरोपींना अटक केल्याने चिपळूणमधील गोवा मद्य तस्करी करणाऱ्या मोठ्या रॅकेटचा पदाफार्श झाला आहे.
ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे प्र.अधीक्षक वैभव व्हि. वैदय, निरीक्षक शरद जाधव, सुरेश पाटील, शंकर जाधव, दुय्यम निरीक्षक सुनिल सावंत, सत्यवान भगत, किरण पाटील, निखील पाटील व जवान विशाल विचारे, सागर पवार, अतुल वसावे, अर्षद शेख यांनी केली. सदर गुन्हयाचा पुढील तपास दुय्यम निरीक्षक किरण पाटील करीत आहेत.