मुंबई – कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना कोरोनाच्या नवीन डेल्टा प्लस व्हेरिएंटमुळे रत्नागिरी जिल्ह्यासह सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.
देशात आतापर्यंत डेल्टा प्लस व्हेरिएंटचे ४० हून अधिक रुग्ण सापडले आहेत. त्यातील २१ रुग्ण एकट्या महाराष्ट्रात असल्याचे आढळून आले. त्यामध्ये सर्वात जास्त रुग्ण हे रत्नागिरी , जळगाव येथे सापडले.आता मात्र या डेल्टा प्लसच्या या २१ बाधित रुग्णांविषयी एक धक्कादायक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. महाराष्ट्र आरोग्य विभाग डेल्टा प्लसच्या बाधित रुग्णांची माहिती घेत आहे. राज्यातील डेल्टा प्लसच्या २१ बाधित रुग्णांनी कोरोना विरोधी लस घेतली नसल्याची माहिती राज्याच्या आरोग्य विभागाचे अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी दिली आहे.
या डेल्टा प्लसच्या २१ रुग्णांमधील एकानेही कोरोना विरोधी लस घेतली नव्हती. तर त्यातील त्यातील ३ रुग्ण हे १८ वर्षांखालील असल्याने त्यांच्यासाठी अद्याप लस उपलब्ध झालेली नाही. मात्र इतर १८ रुग्ण लसींसाठी पात्र असूनही त्यांनी लस घेतली नसल्याचे समोर आले आहे.