रत्नागिरी – रत्नागिरी जिल्ह्याच्या पॉझिटिव्हीटी रेटमुळे रत्नागिरी जिल्ह्याचा समावेश चौथ्या स्तरात समावेश करण्यात आला होता. यामुळे रत्नागिरीत कडक निर्बंध लागू करण्यात आले होते. बाधितांचा वाढत जाणारा आकडा हा चिंतेचा विषय ठरला असतानाच काही दिलासादायक बाबी समोर आल्या आहेत. मागील दोन दिवसात जिल्ह्याच्या पॉझिटिव्हीटी रेट १० पेक्षा खाली आल्याचे पहावयास मिळत आहे. दिनांक १३ जून रोजी १६.०५ इतका पॉझिटिव्हीटी रेट होता. तर दिनांक १४ रोजी १०.६८, दिनांक १५ रोजी ९.९६ तर १६ रोजी ८.६५ इतका घसरल्याचे पहावयास मिळत आहे. बाधित व्यक्तींच्या संपर्कात आलेल्यांची तपासणी, कंटेनमेंट झोन मधील प्रत्येकाची तपासणी, दुकानदार, भाजी विक्रेते, दुध विक्रेते आदी जनतेच्या संपर्कात असणाऱ्या व्यक्तींची तपासणी प्राधान्याने करण्यात आल्याने जिल्ह्याच्या पॉझिटिव्हीटी रेटमध्ये घट झाल्याचे दिसून आले आहे. हि बातमी रत्नागिरीकरांसाठी दिलासादायक असून रत्नागिरी जिल्हा स्तर ३ मध्ये आल्यास कडक निर्बंधातून मोठ्या प्रमाणावर शिथिलता मिळण्याची शक्यता आहे.