चिपळूण -रत्नागिरीत जिल्ह्यातील चिपळूण – कराड मार्गावरील कुभांर्ली घाटात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या मुबंई येथील भरारी पथकाने सापळा रचून गोवा बनावटीची सुमारे दीड कोटींची दारू ट्रकमधून अवैद्यरीत्या वाहतूक करताना जप्त करण्यात आली. गोव्याहून नाशिकला गोवा बनावटीच्या दारूची वाहतूक करणारा एक ट्रक चिपळूण -कराड मार्गावरून जाणार असल्याची माहिती उत्पादन शुल्क विभागाच्या मुबंई येथील भरारी पथकाला मिळाली होती.
यानुसार राज्य उत्पादन शुल्कच्या मुबई भरारी पथकाने सापळा रचुन ही मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणाची राज्य उत्पादन शुल्क विभागाला टीप मिळाली होती, त्यावरुन त्यांनी हा सापळा रचुन कारवाई केली. त्यानुसार मध्यरात्रीच्या दरम्यान सदरचा ट्रक कराड -चिपळूण मार्गवरील कुंभार्ली घाटात आला असता मुंबईच्या भरारी पथकाने मध्यरात्री सापळा रचून शिताफीने पकडला. यानंतर खेर्डी येथील देवकर कंपनीत नेऊन पंचनामा करण्यात आला त्यावेळी ट्रक मध्ये गोवा बनावटीची सुमारे दीड कोटींची दारू आढळून आली. यावेळी हा माल राज्य उत्पादन शुल्क विभागाने जप्त करण्यात आला असून यासह एक ट्रक व युटिलिटी गाडी व दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. रत्नागिरी जिल्ह्यात लॉकडाऊन उठविल्यानंतर पहिलीची मोठी कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाने करून दीड कोटींचा माल जप्त केला.