रत्नागिरी – शासनाने कोरोना रुग्णांचे गृह विलगीकरण बंद केल्यामुळे लक्षणे नसलेल्या कोरोना रुग्णांसाठी २ हजार लोकसंख्या असलेल्या प्रत्येक गावात कोविड सेंटर उभारण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. या कोविड केअर सेंटरचा आर्थिक भार जिल्हा प्रशासनावर किंवा जिल्हा परिषदेवर पडणार नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर केल्याप्रमाणे १५व्या वित्त आयोगातील काही निधी या कोविड केअर सेंटरवर खर्च केला जाईल, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली.
रत्नागिरी जिल्ह्यातील कोविंड परिस्थितीचा उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी आढावा घेतला. यावेळी सामंत म्हणाले की, विलगीकरणात असलेले रुग्ण आसपासच्या भागात फिरुन कोविडचा प्रसार करू नयेत, यासाठी हे कोविड केअर सेंटर उभारणार आहोत.