चिपळूण – येथून जवळच असलेल्या परंतु खेड तालुक्यातील कुंभवली येथे रविवारी ही धक्कादायक घटना घडली.श्रीम.फातिमा उस्मान सकवारे(६५)यांचे सकाळी ९ वाजता हृदयविकाराच्या झटक्याने घरातच निधन झाले.त्यावेळी त्यांचे पती श्री.उस्मान बाबामिया सकवारे(७०) हे कामथे रुग्णालयात उपचार घेत होते.पत्नीच्या निधनाचे वृत्त त्यांना हॉस्पिटलमध्ये समजताच संध्याकाळी त्यांनी देखील प्राण सोडले.पती-पत्नीच्या एकाच दिवशी झालेल्या आशा निधनाने सर्वत्र शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त होत आहे.
पती पत्नीचे नाते म्हणजे सात जन्माच्या गाठी असतात अशी आपली भारतीय संस्कृती आणि परंपरा मानली जाते.पण हे एक अधोरेखित सत्य असते हे पुन्हा एकदा समोर आले आहे.कुंभवली गावातील प्रतिष्टीत लाकूड व्यापारी श्री. उस्मान सकवारे यांना कोरोनाची लागण झाली होती.ते कामथे रुग्णालयात उपचार घेत होते.त्यांची प्रकृती सुधारत होती.कोरोनावर मात करण्याची जबर इच्छाशक्ती त्यांनी बाळगली होती.आणि घरात देखील सर्व व्यक्ती कोरोना निगेटिव्ह होत्या.आशा परिस्थितीत काळाने मात्र वेगळ्याच पद्धतीने येथे झडप घातली.
अतिशय उत्तम ठणठणीत प्रकृती असलेल्या श्रीम.फातिमा उस्मान सकवारे यांना रविवारी सकाळी ९ वाजता हृदयविकाराचा तीव्र झटका बसला त्यातच त्यांचे निधन झाले.दुपारी कुंभवली येथील कब्रस्तानात त्यांचा दफनविधी करण्यात आला.दुर्दैवाने त्यांच्या निधनाने वृत्त पती उस्मान सकवारे यांना हॉस्पिटलमध्ये समजले आणि पत्नीच्या आशा अचानक निधनाने जणू त्यांना धक्काच बसला.काही वेळेतच त्यांनी प्राण सोडले आणि पत्नीच्या पाठोपाठ या जगाचा निरोप घेतला.सकवारे कुटुंबावर जणू दुःखाचा डोंगरच कोसळला.पत्नीच्या दफनविधी आटोपतच पतीच्या निधनाचे वृत्त हे सर्वांनाच धक्कादायक होते.रविवारी रात्री त्यांचा देखील दफनविधी करण्यात आला.त्यांच्या पश्चात मुले-मुली सुना,जावई नातवंडे असा मोठा परिवार आहे.
एकाच दिवशी पती पत्नीच्या आशा निधनाने संपूर्ण कुंभवली गावसह चिपळूण परिसरात देखील हळहळ व्यक्त होत आहे.तर पती-पत्नीचे नाते हे सात जन्माच्या गाठी असतात हे यानिमित्ताने नियतीनेच पुन्हा एकदा अधोरेखीतपणे दाखवून दिले असल्याच्या प्रतिक्रिया देखील उमटत आहेत.
![](https://pragatitimes.in/wp-content/uploads/2021/04/IMG-20210427-WA0028-862x1024.jpg)