कौंढर काळसूर येथे हातभट्टी वर उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन बारी यांच्या पथकाचा छापा

0
199
बातम्या शेअर करा

चिपळूण – गुहागर तालुक्यातील कौंढर काळसूर येथील हातभट्टीवर उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन बारी यांच्यासह पथकाने छापा टाकला. या कारवाईत २ लाख २३ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल पकडला. या कारवाईदरम्यान हातभट्टी जवळ असलेला अनोळखी इसम जंगलाच्या दिशेने पळून गेला आहे. याप्रकरणी अज्ञात इसमाविरोधात येथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काही दिवसांपूर्वी उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन बारी यांनी मार्गताम्हाणे येथे हातभट्टीवर धाड टाकून येथील हातभट्टीचा पर्दाफाश केला होता. येथील हातभट्टी मधून चिपळूण- गुहागर पंचक्रोशीत गावठी दारूचा पुरवठा केला जात असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, शुक्रवारी उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन बारी हे आपल्या पथकास समवेत ग्रामीण भागात गस्त घालत असताना कौंढर काळसूर येथे हातभट्टी सुरू असल्याची माहिती मिळाली. यानुसार या हातभट्टीच्या ठिकाणी पोलिस छापा टाकण्यासाठी गेले असता हातभट्टी येथील अनोळखी इसम पोलिसांना पाहून जंगलाच्या दिशेने पळून गेला. मात्र, या ठिकाणी मोठी हातभट्टी चालवली जात असल्याचे समोर आले. यावेळी गावठी दारू, नवसागर, टाक्या आदी दारू बनविण्याचे साहित्य पकडण्यात आले. एकंदरीत चिपळूण तालुक्‍यात मोठ्या प्रमाणात हातभट्ट्या धगधगत असल्याचे समोर आले आहे. ही कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन भारी यांच्यासह पोलीस नाईक इमरान शेख, श्री. कुळे, श्री. इपाळ, श्री. वागदकर, श्री कांबळे यांनी केली. ग्रामीण भागातील हातभट्ट्यांवर कारवाई अशीच सुरू राहील, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here