चिपळूण – चिपळूण तालुक्यातील चिवेली येथे राष्ट्रीय पेयजल योजनेतील 48 लाखाच्या कामामध्ये निकृष्ट दर्जाचे काम झाल्यामुळे या कामाची चौकशी लावण्यात असून या कामासंदर्भात ग्रामस्थांशी चर्चा करण्यासाठी उद्या वरिष्ठ स्तरावरून अधिकारी येणार असल्याने हे राष्ट्रीय पेयजल योजनेचे काम सध्या चिवेली पंचक्रोशीत एक चर्चेचा विषय बनले आहे.
चिपळूण तालुक्यातील चिवेली हे महत्त्वपूर्ण गाव या ठिकाणी सन 2013 आणि 2014 मध्ये राष्ट्रीय पेयजल योजना मंजूर झाली ही योजना जवळपास सहा वाड्यांसाठी मंजूर करण्यात आली होती. यामध्ये पाण्याच्या साठवणीच्या टाकीपासून या वाडीपर्यंत पाईप टाकण्यासाठी ही निविदा मंजूर करण्यात आली आहे प्रत्यक्षात मात्र ठेकेदाराने 48 लाख रुपये मंजूर असलेल्या या कामांमध्ये फक्त पाण्याची साठवण टाकीचे काम केलं आणि वाडीमध्ये असलेल्या जुन्यात नळपाणी योजनेला ही पाईपलाईन जोडली आणि या योजनेतील जवळपास 48 लाख हा खाण्याचा प्रयत्न केला. याच वेळी या गावातील नागरिक सिद्धेश शिर्के यांनी या कामासंदर्भात माहिती अधिकार टाकून माहिती घेत या कामाची चौकशी लावली त्यावेळी हे काम निकृष्ट दर्जाचा झाल्याचं अधिकाऱ्यांच्या प्रथम तपासणी दिसून आले. त्यामुळे आता त्या ठेकेदारावर कोणती कारवाई होणार ? त्या ठेकेदाराला जे कोणी पाठीशी घालत आहेत त्यांच्यावर प्रशासन कोणती कारवाई करणार ? याकडे संपूर्ण गावाचे लक्ष लागून राहिले मात्र जर 48 लाख रुपयाचे काम जर एकदा ठेकेदार असे निकृष्ट दर्जाचे करत असेल तर त्या ठेकेदाराला कायमस्वरूपी काळ्या यादीत टाकण्याची मागणी येथील ग्रामस्थ करत आहेत. त्यामुळे उद्या होणाऱ्या प्रशासन व ग्रामस्थांच्या होणाऱ्या बैठकीकडे सर्वच ग्रामस्थांचे लक्ष लागून राहिले.