मार्गताम्हणे – चिपळूण तालुक्यातील मार्गताम्हाणे येथील एका राष्ट्रीयीकृत बँकेत दोन कर्मचाऱ्यांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी झाल्याने ही बँक चर्चेत आली आहे. काही दिवसांपूर्वी घडलेली ही घटना आहे. या घटनेचे सर्व चित्रीकरण सीसीटीव्हीत झाले असून या बँकेचा सीसीटीव्हीची तपासणी करून या दोन्ही कर्मचार्यांवर कारवाई करण्याची मागणी आता येथील ग्रामस्थ करत आहेत. या बँकेत याआधी सुद्धा असे अनेक प्रकार घडले आहेत. मात्र वरिष्ठ अधिकारी या बँकेकडे लक्ष देत नसल्याने येथील स्थानिकांनमधून नाराजी व संताप व्यक्त करण्यात येत आहे. बँकेत जी फ्रीस्टाईल मारामारी झाली ती बँकेच्या ग्राहकांच्या समोर झाली या फ्री-स्टाईल हाणामारीची चर्चा सध्या संपूर्ण मार्गताम्हाणे पंचक्रोशीसह गुहागर आणि चिपळूण तालुक्यात सुरू आहे.