जानवळे ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदी शिवसेनेचे किशोर कुलकर्णी विराजमान

0
763
बातम्या शेअर करा


गुहागर -नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत गुहागर तालुक्यातील जानवळे ग्रामपंचायतवर शिवसेनेने आपले वर्चस्व सिध्द केले. ९ सदस्य व एक सरपंच असलेल्या या ग्रामपंचायतीच्या नवनिर्वाचीत सदस्यांमधून गुरूवारी उपसरपंचाची निवडणूक करण्यात आली असता शिवसेनेचे किशोर कुलकर्णी यांनी विजयी होवून उपसरपंच पदाची खुर्ची हासील केली.

गेले ३७ वर्षे एकनिष्ठ शिवसेनेमध्ये काम करणारे किशोर कुलकर्णी विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुकाध्यक्ष विनोद जानवळकर यांच्या पत्नी वैभवी विनोद जानवळकर त्यांच्या विरोधात उभ्या होत्या. उपसरपंच पदासाठी फक्त दोनच दावेदार असल्यामुळे फक्त दोनच उमेदवारांमध्ये चुरशीची लढत झाली. त्यामध्ये किशोर कुलकर्णी एका मताने निवडून आले अशाप्रकारे उपसरपंच पदही सेनेकडेच अबाधित राहिले. मात्र मनसेचे तालुकाप्रमुख विनोद जानवळकर यांच्या पत्नी वैभवी जानवळकर यांनी किशोर कुलकर्णी यांना मोठी शिकस्त दिली. परंतू फक्त एका मताने किशोर कुलकर्णी उपसरपंच म्हणून निवडून आले. या निवडणुकीत निवडणुक अधिकारी म्हणून जानवळेचे सरपंच नम्रता संसारे यांनी काम पाहिले.
किशोर कुलकर्णी यांची उपसरपंच पदी निवड झाल्याबद्दल सेनेचे स्थानिक कार्यकर्ते अर्जुन शितप, पिंटया संसारे, भाई जांभळे, बाबू शिरगावकर, बंधू कोंडविलकर, अरविंद म्हादलेकर, भरत शितप, विजय जानवळकर, अशोक रहाटे तसेच कुलकर्णी यांचे मित्र आणि ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here