चिपळूण – चिपळूण वैश्य समाज चिपळूण या संस्थेच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे सामाजिक उपक्रम राबवले जातात यालाच अनुसरून इयत्ता 10वी व इयत्ता 12वी मधील 35 गुणवंत विद्यार्थ्यांचा धनादेश आणि भेटवस्तू देऊन गुणगौरव तसेच कोरोना सारख्या महाभयंकर परिस्थितीत आपल्या जीवाची पर्वा न करता सुरुवातीपासून आजतागायत कार्यरत असणाऱ्या विशेषतः आरोग्य क्षेत्रातील डॉक्टर्स तसेच शासकीय व निमशासकीय, प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये कार्यरत असणाऱ्या वैद्यकीय अधिकारी, नर्सेस, वॉर्डबॉय, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी व आशा सेविका, तसेच मेडिकल स्टोअर्स, पॅथॉलॉजी लॅब, ऍम्बुलन्स सेवा, पोलीस अधिकारी व कर्मचारी,प्रिंट मीडिया व इलेक्ट्रॉनिक मीडिया, मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह, आदि क्षेत्राशी निगडित 57 वैश्य समाजातील कोरोना योद्ध्यांचा सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र वैश्य समाज बांधवांच्या उपस्थितीत गौरव करण्यात आला. या कार्यक्रमासाठी चिपळूण वैश्य समाजाचे आधारस्तंभ श्री. सुचयअण्णा रेडीज, समाजाचे विश्वस्त उदय गांधी आणि श्रीमती कुंदाताई समाजाचे आधारस्तंभ ॲडव्होकेट दिलीप उर्फ भाऊ दळी , चिपळूण अर्बन बँकेच्या चेअरमन राधिका पाथरे, समाजाचे अध्यक्ष पंकज कोळवणकर, सल्लागार अनिल उर्फ बाबुराव खातू , उपाध्यक्ष. प्रमोद गांगण, सचिव अमोल टाकळे. समाजाचे आधारस्तंभ , अमरीश उर्फ दादा खातू, अनिल खेडेकर, सतीश अप्पा खेडेकर नगरसेवक आशिष खातू नगरसेविका रसिका देवळेकर ,समाजाचे संचालक व लायन्स क्लबचे रिजनल चेअरमन बापू गांधी ,वैश्य महिला मंडळाच्या अध्यक्षा गौतमी गांधी व महिला पदाधिकारी तसेच आदी मान्यवरांच्या उपस्थितीत विशेष गौरव करण्यात आला.