चिपळूण -(विशेष प्रतिनिधी )- ऑपरेशन करताना रुग्णाच्या पोटात गॉज पंड राहिल्याने रूग्णास झालेला मानसिक त्रास आणि उपचारापोटी झालेला सात लाखाचा खर्च याप्रकरणी पेढाये येथील संजय मधुकर शिंदे यांचा तक्रार अर्ज बुधवारी मंत्रालयातील आरोग्य मंत्र्यांच्या जनता दरबारात दाखल झाला. याप्रकरणी आरोग्यमंत्री राजेश टोपे पानी तक्रार असलेल्या चिपळूण शहरातील एसएमएस हॉस्पिटलची चौकशी करून तात्काळ कारवाई करण्याचे आदेश जिल्हा शल्यचिकित्सकांना बुधवारी दिले.
शिंदे यांनी जनता दरबारात दाखल केलेल्या तक्रार अर्जात म्हटले आहे. १० जून रोजी घरघुती भांडण सोडवत असतानाच माझ्या पोटावर चाकूचा वार झाला. त्यामध्ये मी गंभीर जखमी झालो. नातेवाईकांनी आपणास चिपळूण शहरातील एसएमएस हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तेथे माझे ऑपरेशन होऊन वीस
दिवसानी मला घरी सोडण्यात आले. मात्र – ऑपरेशनच्या ठिकाणी मला पिवळा फोड आला आणि त्यातून लस येऊ लागली. त्यामुळे पुन्हा हॉस्पिटलमध्ये गेलो. दोन-तीन महिने माझे ड्रेसिंग केले. मात्र लस काही थांबत नव्हती त्याच वेळी मी चिपळूण शहरातील पाटणकर डॉक्टरांकडे गेलो त्यांनी १४ सप्टेंबर रोजी माझी सोनोग्राफी केली. त्यामध्ये गॉज पॅड आढळून आला. त्यामुळे त्या ठिकाणी पू झाला होता. त्यानंतर पुन्हा १५ सप्टेंबरला सोनोग्राफी करून खात्री करण्यात आली.
या प्रकारामुळे आपले कुटुंब घाबरले. याबाबतची माहिती आमदार तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी, ग्रामस्थांना सांगितली. ऑपरेशन . करणाऱ्या डॉ. गौड यांना याबाबतची माहिती
दिल्यानंतर त्यानी, मी खर्च देईन तुम्ही पुढे उपचार करा, असे सांगितले. त्यामुळे डॉक्टर पाटणकर यांनी २३ सप्टेंबरता औपरेशन करून गाँज व पॅड काढले मात्र त्यावेळी आतड्याला भोक पडलेले असल्याचे लक्षात आल्यावर अन्य ठिकाणी जाऊन औपरेशन करण्याचा सल्ता दिला. त्यानुसार पुणे येथे दिनानाथ मंगेकर जाऊन ऑपरेशन केले. यासाठी ७ लाखापर्यंत खर्च आला
आहे. गरीब कुटुंबातील असल्याने आपण या उपचारावर झालेल्या खर्चामुळे कर्जबाजारी झालो आहोत. ज्या डॉक्टरामुळे माझे नुकसान झाले त्यांच्या हॉस्पिटलची परवानगी रद्द करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अन्यथा २६ जानेवारीला प्रांत कार्यालयासमोर उपोषणाला . बसू असे तक्रार अर्जात म्हटले आहे.