बातम्या शेअर करा


गुहागर: गुहागर तालुक्यातील १६ ग्रामपंचायतीच्या होणाऱ्या निवडणुकांपैकी गिमवी- देवघर या ग्रुप ग्रामपंचायतीत शिवसेना विरूध्द नाराज शिवसेना पुरस्कृत गावपॅनल अशी लढत होत असल्याने ही निवडणुकी अतिशय अटीतटीची होणार असून प्रत्येक मतदार हा महत्वपूर्ण मानला जात असल्याने या निवडणुकीकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे.
गिमवी- देवघर या ग्रुप ग्रामपंचायतीत गेली पाच वर्षे शिवसेनेचे निर्विवाद वर्चस्व आहे. या ग्रामपंचायतीत एकूण ९ सदस्य असून ही ग्रामपंचायत दोन गावांत विभागली गेली आहे. सध्या या ठिकाणी ९ जागांसाठी तब्बल २२ उमेदवार रिंगणात आहेत. हे सर्व २२ उमेदवार शिवसेना आणि फक्त शिवसेना या पक्षासी निगडीत असल्याने याठिकाणी होणारी निवडणूक ही शिवसेना विरूध्द शिवसेनेमध्ये नाराज असणारे ग्रामस्थांमध्येच होत असल्याने याठिकाणी नक्की कोण बाजी मारणार याची चर्चा संपूर्ण तालुक्यात सुरू आहे. त्यामुळे या ग्रामपंचायतीवर नक्की कोण विजयी होणार याचा निकाल मात्र मतदानानंतरच कळेल.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here