कराड – महापारेषण कंपनीतील सर्वांचे लाडके आणि कामगार वर्गासाठी अत्यंत जवळचे असे विजय (भाऊ) कदम हे नुकतेच आपल्या 37 वर्षाच्या कारकीर्दी नंतर महापारेषणच्या सेवेतून सेवानिवृत्त झाले.
महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळ या कंपनीत नीममस्तर लिपिक या पदी रुजू झालेले विजयराव कदम मूळ गाव कराड जिल्हा सातारा , येथील राहणारे त्यामुळे पहिल्यापासूनच त्यांना इतरांच्या समस्या जाणून घेणे इतरांना मदत करणे असे छंद होते. ज्या वेळेला महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ या कंपनीत रुजू झाले त्या पहिल्या दिवसापासूनच त्यांनी कंपनी व कामगार वर्गासाठी काही करता येईल जे काही चांगले करता येईल याचा प्रयत्न केला.गेली 37 वर्षा त्यांनी धुळे ,रत्नागिरी ,पुणे ,महाड ,आणी कराड या ठिकाणी आपली कारकीर्द योग्यरीत्या सांभाळली.37 वर्ष उत्कृष्ट सेवा करत असतानाच ते महापारेषणच्या उप-व्यवस्थापक(मास) या पदावरून परिमंडळ कार्यालय कराड येथे निवृत्त झाले. त्यांनी आपल्या 37 वर्षाच्या कारकिर्दीत अनेक पदे भूषवली आणि त्यात ते यशस्वी झाले. कामगार वर्गातील लाडके व्यक्तिमत्व म्हणून त्यांचा आजही उल्लेख होतो. कामगारांचे अनेक प्रश्न ते वरिष्ठ स्तरांवर चर्चा करून सोडवण्याच्या त्यांच्या कलेमुळे ते कामगार वर्गात खूप लोकप्रिय होते. त्याच प्रमाणे ते
सातारा जिल्हा सेवकांची सह, पत संस्था सातारा विद्यमान अध्यक्ष आहेत.तर ,कराड झोन वर्कर्स फेडशनचे झोनल अध्यक्ष ही आहेत. यांचा सेवानिवृत्ती चा कार्यक्रम नुकताच कराड येथील विजयनगर मध्ये एका हॉल मध्ये मोठ्या थाटामाटात संपन्न झाला यावेळेला या कार्यक्रमामध्ये
आमदार आनंदराव पाटील, सुधीर वानखेडे महाव्यवस्थापक मास MPP सांघिक कार्यालय मुंबई,मुख्य अभियंता अनिल कोलप ,माजी मुख्य अभियंता विकास बढे, तसेच अनेक अधिकारी आणि सर्व संघटनांचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.त्याच प्रमाणे वर्कर्स फेडरेशन या संघटनेचे नानासाहेब सोनवलकर ,सतीश जाधव,
यांच्यासह अनेक कर्मचारी उपस्थित होते.विजय भाऊ यांच्या आजच्या शेवटच्या दिवशी सुद्धा अनेकांना विजय भाऊ यांची कारकीर्द अजून काही दिवस हवी होती असे वाटत होते. कारण विजय भाऊ सोबत असताना त्यांनी दिलेले प्रेम याची आठवण कायम कामगार आणि अधिकाऱ्यांच्या मनात राहणार आहे. हे मात्र तेवढेच खरे…..