वसई – (विशेष प्रतिनिधी )- विवाह संकेतस्थळावर आपण उच्चशिक्षित आहोत व लग्नं करण्यासाठी तयार आहोत असे भासवून वसई पश्चिम येथे राहणाऱ्या एका तरुणीशी ओळख वाढवून तीला लग्नाचे आमिष दाखवून वारंवार तिच्याकडून पैसा उकळून तिची गाडी आपल्या ताब्यात घेऊन नंतर लग्नासाठी नकार देऊन फसवणूक करणाऱ्या भामट्याच्या मुसक्या चिपळूणचे सुपुत्र व माणिकपूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक उमेश भागवत यांनी आवळून त्याला अटक केली आहे.
जीवनसाठी डॉट कॉम या प्रसिद्ध विवाह संकेतस्थळावर नोंद असलेल्या विवाह इच्छुक मुलीन मधील वसई येथे राहणारी नेहा (नाव बदललेले आहे) हिची ओळख आरोपी विकास मनोहर पाटील याने काढली. आरोपी विकास पाटील याने स्वतःचे दुसर नांव, शैक्षणिक पात्रता अशी खोटी माहिती देऊन याच संकेतस्थळावर आपली नोंदणी केली होती. याचा फायदा घेऊन व लग्नाचे आमिष दाखवून विकासने नेहाचा विश्वास संपादन करून वारंवार पैश्याची मागणी करून नेहाकडून ७ लाख ८१ हजार रुपये उकळले. तर नेहाची चारचाकीचा ताबा आरोपी विकास याने गोड बोलून मिळवला व पसार झाला. वारंवार फोन करून देखील काहीच ठावठिकाणा वा प्रतिसाद मिळत नसल्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे नेहाच्या लक्षात आले व तीने माणिकपूर पोलीस ठाणे गाठले. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक उमेश भागवत व त्यांच्या टीमने तपास सुरु केला. आरोपी विकास पाटील याची संकेतस्थळावरील माहिती व इतर तांत्रिक बाबीचा सखोल तपास करून मूळचा राहणारा ता.राहुरी, जिल्हा अहमदनगर याला पुणे येथून ताब्यात घेण्यात आले. आरोपी हा फ़क्त दहावीपास असून त्याचा इस्टेट एजन्टचा व्यवसाय आहे. बेचाळीस वषीय विकास पाटील हा अविवाहित असून तो वेगवेगळी नावे धारण करून नेहमी आपले राहायचे ठिकाण बदलायचा तरी देखील उत्तम तपास करून पोलिसांनी या भमट्याला बेड्या ठोकल्या. पोलीसांनी नेहाची हुई गाडी व ६ लाख ६४ हजार रूपये असा मुद्देमाल देखील आरोपी कडून हस्तगत केला असून त्याच्या वर भादवि ४२०, ४०६ कलम अनव्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला मा.न्यायालयाने २७ पर्यंत पोलीस कोठडी व आता न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. सदरची कामगिरी पोलीस उपायुक्त वसई. संजय पाटील, सहायक पोलीस आयुक्त.वसई अश्विनी पाटील, माणिकपूर पोलीस ठाणे राजेंद्र कांबळे यांच्या मार्गदशनाखाली पो.उप.नि उमेश भागवत, पो.ना.केणी, पो. शि. कोरडे यांनी केली आहे.