चिपळूण ; प. बंगालहून फसवून आणलेल्या दोन अत्याचारीत मुलींची हेल्प फौंडेशनने केली सुटका

0
350
बातम्या शेअर करा

चिपळूण – पश्चिम बंगालहून फसवून आणलेल्या व गेले दोन महिने अनैतिक धंद्याच्या खाईत लोटल्या गेलेल्या दोन मुलींची हेल्प फौडेशनने चिपळूण पोलिसांच्या मदतीने सुटका केली. या प्रकरणी पोलिसांनी कसून चौकशी करण्यास सुरुवात केली असून, हा अनैतिक व्यवसाय किती दिवस सुरू होता, कोणकोण यामध्ये सहभागी आहेत याचा शोध घेतला जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

खेर्डी येथे भाजीपाला व्यवसाय करणारा मुहमद शेख याने पश्चिम बंगाल येथील दोन तरुणींना नोकरीचे अमिष दाखवून येथे आणले होते. यातील एका मुलीचे वय अवघे १६ वर्षे आहे. या दोघीना नंतर मारहाण, धमक्या देत गेले दोन महिने अनैतिक व्यवसाय करण्यास भाग पाडण्यात आले. या संदर्भात हेल्प फौंडेशनचे अध्यक्ष सतीश कदम यांच्याकडे माहिती येताच त्यांनी तातडीने खेर्डी येथे सदर पीडित मुलींची भेट घेतली, यावेळी संस्थेचे सदस्य श्रीधर भुरणही होते. त्यानंतर सतीश कदम यांनी त्यांना धीर व विश्वास दिला व तेथूनच पोलीस निरिक्षक देवेंद्र पोळ यांना या गंभीर प्रकाराची कल्पना दिली. त्यानंतर पोलीस स्टेशनला बैठक होवून या रेस्कू ऑपरेशनची तयारी झाली. सापळा रचून खेर्डी येथून संशयिताला बेसावध ठेवून पकडण्यात आले. या प्रकरणी मुहमद शेख याच्यावर फोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून अटक करण्यात आली आहे. त्याला न्यायालयात हजर केली असता ३० नोव्हेंबर पर्यत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणी अधिक तपास पोलीस करत आहेत.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here