गुहागर – विजापूर महामार्गाच्या शुंगारतळी बाजरपेठेतील रस्त्याची उंची कमी ,व्यापारी वर्गाला मोठा दिलासा

0
350
बातम्या शेअर करा

शुंगारतळी- (विशेष प्रतिनिधी ) – गुहागर विजापूर मार्गावरील गुहागर तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या शृंगारतळी शहरात रस्त्याची उंची 5 फुटाने वाढणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर शहरातील सर्व व्यापारी आणि ग्रामस्थानिकांनी या वाढीव उंचीला विरोध दर्शवत आक्रमक झाले होते. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक तालुका अध्यक्ष गौरव वेल्हाळ यांनी प्रशासनाला शहराच्या होणाऱ्या नुकसनाबद्दल जाणीव करून देत वाढीव उंचीला विरोध असल्याचे सांगितले, सोबतच या घटनेचे गांभीर्य खासदार सुनील तटकरे यांच्या कानावर घातले. शृंगारतळी शहरातून जाणाऱ्या रस्त्याची उंची 5 फूट वाढली तर शहराच्या विद्रुपीकरणासह इथला व्यापारी उध्वस्त होईल, बाजारपेठ नष्ट होईल त्यामुळे याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी केली. खासदार तटकरे यांनी या तक्रारीची तात्काळ दखल घेत वरिष्ठ अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा करून शहरातल्या रस्त्याची उंची कमीत कमी व्हावी यासाठी सूचना केल्या आहेत.त्यामुळे शृंगारतळी शहरातल्या व्यापाऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here