रत्नागिरी – जिल्ह्यात हातपाटी वाळू उत्खननास परवानगी देण्यात आली आहे. महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाने जिल्ह्यातील चार खाड्यांचे सर्व्हेक्षण पूर्ण केले आहे. यामध्ये 6 लाख 29 हजार 357 ब्रास वाळू काढण्यास योग्य असुन तशी परवानगी दिली आहे. मात्र वाळूच्या उत्खननासाठी परवाने देणे आणि दर निश्चित करण्यासाठीचा प्रस्ताव जिल्हा खनिकर्म विभागाने शासनाकडे पाठविला आहे. जिल्ह्यातील आंजर्ला खाडीतील 3 गट, दाभोळ, जयगड आणि काळबादेवी या तीन खाड्यामधील प्रत्येकी एक गट अशी एकुण 6 हातपाटी गट आहेत. यात 6 लाख 29 हजार 357 ब्रास वाळू उपसाला मेरीटाईम बोर्डाकडुन परवानगी देण्यात आली आहे. यासाठी वाळुच्या उत्खननसाठी आता दर निश्चित करण्यात येणार आहे. त्यासाठी शासनाकडे लवकरच प्रस्ताव पाठण्यात येणार आहे. ड्रेजरने वाळू उपसा करण्यासाठीही मेरीटाईम बोर्डाकडुन सर्व्हेक्षण झाल्यानंतर वाळू उत्खननसाठी ना हरकत परवानगी देण्यात येणार आहे. जिल्हा खनिकर्म अधिकारी दिग्विजय पाटील यांनी याला दुजोरा दिला.