गुहागर ; आबलोलीतील अंगणवाड्यांमध्ये पोषण माह विविध उपक्रमांनी साजरा

0
254
बातम्या शेअर करा

आबलोली- एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प गुहागर अंतर्गत बीट आबलोली मधील अंगणवाडी आबलोली पागडेवाडी, आबलोली बौद्धवाडी व आबलोली कोष्टेवाडी या आबलोली गावातील तिन्ही अंगणवाड्यांमध्ये पोषण माह सप्टेंबर २०२० विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला.
प्रकल्प अधिकारी प्रकाश भोसले, बीट पर्यवेक्षिका उज्ज्वला पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आबलोली गावातील अंगणवाड्यांमध्ये ० ते ६ वयोगटातील बालके,गरोदर व स्तनदा माता यांच्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात आले. अंगणवाडी केंद्राअंतर्गत येणारे लाभार्थी या उपक्रमात सहभागी झाले होते. या उपक्रमांतर्गत सॅम बालकांना गृहभेटी, गरोदर व स्तनदा मातांना गृहभेटी, 0 ते 6 वर्षे वयोगटातील बालकांचे वजन व उंचीचे मापन, पालकांचे समुपदेशन, आहारा विषयक मार्गदर्शन, वैयक्तिक स्वच्छता इत्यादी उपक्रम राबवण्यात आले. कोरोना आपत्तीच्या काळातही बालकांचे तसेच गरोदर व स्तनदा माता यांचे स्वास्थ्य उत्तम राखण्याबाबत अंगणवाडी केंद्रातून मार्गदर्शन करण्यात आले. अंगणवाडी सेविका सुनीता पवार, प्रिया कदम, रिया रेपाळ तसेच मदतनीस स्वाती पागडे, संजीवनी वैद्य,नम्रता कारेकर यांनी ग्रामस्थ, पालकांच्या मदतीने पोषण माह यशस्वीपणे साजरा केला.यातील विविध उपक्रमांमध्ये गावातील सरपंच,ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक,आशा सेविका तसेच ग्रामस्थांनी सहभाग मधून उपक्रम यशस्वी केला.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here